no images were found
अदाणी ग्रुपचा बॅटरी एनर्जी स्टोरेज क्षेत्रात प्रवेश – जगातील सर्वात मोठ्या बीईएसएस प्रकल्पांपैकी एक प्रकल्प उभारणार
अहमदाबाद, : अदाणी ग्रुपने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स – (बीईएसएस) क्षेत्रात 1126 मेगावॅट / 3530 मेगावॅट तास क्षमतेच्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून ऐतिहासिक प्रवेशाची घोषणा केली आहे. या प्रकल्पात 1126 मेगावॅट ऊर्जा क्षमता आणि 3530 मेगावॅट तास स्टोरेज क्षमता असेल, म्हणजेच सिस्टम्स सुमारे 3 तासांची अतिरिक्त ऊर्जा साठवू शकेल. या प्रकल्पासाठी 700 पेक्षा जास्त बीईएसएस कंटेनर वापरले जाणार आहेत. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा आणि जगातील एकाच ठिकाणी उभारला जाणारा सर्वात मोठ्या बीईएसएस प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. हा ऐतिहासिक प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.
ही धोरणात्मक योजना भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणारी आणि 24 तास स्वच्छ वीज उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. तसेच, देशाला कमी कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने पुढे नेण्यातही ती मदत करेल. बीईएसएस सिस्टम वीजेच्या जास्त मागणीच्या काळात ताण कमी करण्यात, वीज प्रसारणातील अडचणी कमी करण्यात आणि सौरऊर्जेतील कपात कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे वीज पुरवठा अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम बनेल.
हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्प असलेल्या खवडा (गुजरात) येथे उभारला जात आहे. अत्याधुनिक लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान आणि प्रगत ऊर्जा व्यवस्थापन प्रणालींसह विकसित होणारा हा प्रकल्प उत्कृष्ट कार्यक्षमता आणि विश्वसनीयतेची खात्री देईल. हा प्रकल्प वीजेच्या जास्त मागणीच्या काळात पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी आणि ऊर्जा साठवून आवश्यकतेनुसार वापरण्यास मदत करेल. त्यामुळे वीज क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होईल. हा अभिनव प्रकल्प जगाच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे वीज ग्रीड अधिक स्थिर होईल, अक्षय ऊर्जेचा वापर वाढेल आणि चोवीस तास वीज उपलब्ध राहील. या प्रकल्पामुळे खवडा अक्षय ऊर्जा प्रकल्पाला जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा (“री-एनर्जी )आणि स्टोरेज पार्क म्हणून ओळख मिळेल.
ऊर्जा परिवर्तनाकडे एक मोठी झेप
या प्रसंगी अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले,“ऊर्जा संचय (एनर्जी स्टोरेज) हे अक्षय उर्जेवर आधारित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाद्वारे आम्ही केवळ जागतिक स्तरावर नवे मापदंड निर्माण करत नाही, तर भारताच्या ऊर्जा स्वावलंबन आणि शाश्वत विकासाबद्दलची आमची बांधिलकीही अधिक मजबूत करत आहोत. या उपक्रमामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर विश्वसनीय, स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जा उपाययोजना पुरवणे शक्य होईल.”
या धोरणात्मक उपक्रमामुळे अदाणी ग्रुप मोठ्या एनर्जी स्टोरेज प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जागतिक ऊर्जा कंपन्यांच्या श्रेणीत सामील झाला असून, भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील हा एक महत्त्वाचा आणि परिवर्तनकारी टप्पा ठरला आहे.
विस्तारणाचे उद्दिष्ट: आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 15 GWh आणि पुढील पाच वर्षांत 50 GWh क्षमतेपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य
या प्रमुख प्रकल्पाच्या आधारावर अदाणी ग्रुपने एनर्जी स्टो क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्ताराचे स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. समूह मार्च 2027 पर्यंत अतिरिक्त 15 गिगावॅट तास (GWh) क्षमतेचे बीईएसएस प्रकल्प उभारणार असून, पुढील पाच वर्षांत एकूण 50 GWh क्षमतेपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे मोठे उद्दिष्ट भारताच्या नेट-झिरो ध्येयाशी आणि जागतिक हवामान बांधिलकीशी सुसंगत, मजबूत आणि भविष्यसिद्ध ऊर्जा परिसंस्था निर्माण करण्याच्या अदाणी ग्रुपच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.