Oplus_131072
no images were found
महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल करावेत :- विजय जाधव
कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका सावर्त्रिक निवडणूक २०२५ ची प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. कोल्हापूर मध्ये प्रथमच चार सदस्यीय निवडणूक होणार आहे. आगामी होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या इच्छुक उमेदवारांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी भाजपा प्रदेश महाराष्ट्र च्यावतीने प्राप्त झालेले विहित नमुन्यामधील अर्ज भाजपा जिल्हा कार्यालयाकडे दाखल करावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.