Home शासकीय उद्या काळा दिवस, शिवसेनेची मशाल रॅली अडवली, कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच

उद्या काळा दिवस, शिवसेनेची मशाल रॅली अडवली, कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच

0 second read
0
0
228

no images were found

उद्या कला दिवस, शिवसेनेची मशाल रॅली अडवली, कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच

      कोल्हापूर : उद्या कला दिवस असल्याने कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरुद्ध  शिवसेना ठाकरे गटाची  बेळगावच्या दिशेने निघालेली मशाल रॅली कोगनोळीजवळ अडवली आहे. कर्नाटक सरकारची दडपशाही गृहित धरून शिवसैनिकांनी गनिमी काव्याने रॅली नेण्याचा निर्धार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी शिवसेनेकडून ‘दिवस वेदनांचा, दौड मशालीची’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव येथे 1 नोव्हेंबरला काळा दिन’ पाळला जातो.

मशाल रॅली अडवण्यात आल्यानंतर बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिवाजी महाराज की जय म्हणत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. रॅली अडवण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी महामार्गावरच ठिय्या मारला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, हे एक दडपशाहीचे उदाहरण आहे. देशात हुकूमशाही, दडपशाही सुरु आहे त्याचेच हे प्रतीक आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेकरांनी लोकशाहीत दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचे काम कर्नाटक करत असल्याचा आरोपही संजय पवार यांनी केला. आम्ही मशाल पेटवली आहे, मराठी बांधवाना ताकद देण्याचे काम करत असताना हे दादागिरी करत आहेत.

यांनी आज अडवलं असलं, तरी उद्या मशाल आणि भगवा झेंडा बेळगावात पोहोचेल, असा निर्धार संजय पवार यांनी व्यक्त केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी शिवसेनेकडून ‘दिवस वेदनांचा, दौड मशालीची’ या रॅलीचे आयोजन केले आहे. बेळगाव येथे 1 नोव्हेंबरला काळा दिन’ पाळला जातो. रॅलीत सुमारे एक हजारो शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिली आहे.

कर्नाटक सरकारची सीमाभागातील दडपशाही नवीन नाही. आज शिवसेनेची मशाल रॅली येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून कोगनोळी टोलनाक्यावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रॅलीने बेळगावमध्ये प्रवेश करू नये, यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाहू समाधीस्थळापासून मशाल रॅलीला सुरुवात करण्यात आली. धगधगती मशाल आणि भगवा झेंडा घेवून काळ्या पट्ट्या बांधून रॅली बेळ्गावच्या दिशेने रवाना झाली होती. कोल्हापुरातून ही रॅली निघणार कागल, कोगनोळी, निपाणी, संकेश्वर, हत्तरगीमार्गे बेळगावमध्ये पोहोचण्याचे नियोजन आहे. रॅलीत ठिकठिकाणी कार्यकर्तें सहभागी होणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…