Home शासकीय गॅस, जीएसटी, विम्यांचे नियम उद्यापासून बदलणार

गॅस, जीएसटी, विम्यांचे नियम उद्यापासून बदलणार

3 second read
0
0
197

no images were found

गॅस, जीएसटी, विम्यांचे नियम उद्यापासून बदलणार

नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. विमा पॉलिसी असो किंवा दर महिन्याला येणारे एलपीजी सिलिंडर असो. या सर्व सुविधा अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी अनेक बदल केले जात आहेत.
दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेतात आणि आवश्यक असल्यास त्यात बदलही केले जातात. उद्या पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतींत बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आता तुम्हाला सिलेंडरच्या बुकिंगवर OTP मिळेल आणि हा OTP डिलिव्हरीच्या वेळी द्यावा लागेल. तरच तुम्हाला LPG सिलेंडर दिला जाईल. १ नोव्हेंबरपासून सर्व प्रकारच्या विमा पॉलिसींसाठी केवायसी अनिवार्य करण्यात येणार आहे. आता जीवन विमा पॉलिसी असो किंवा सामान्य विमा. सर्व पॉलिसी ग्राहकांना KYC करणे आवश्यक असेल. आतापर्यंत केवायसी केवळ आयुर्विमा पॉलिसींसाठी आवश्यक होते. आता आरोग्य आणि वाहन विम्यासाठीही केवायसी करावे लागणार आहे. आत्तापर्यंत केवळ १ लाख रुपयांच्या वरच्या पॉलिसींसाठी विमा कंपन्या त्यात केवायसी करत आहेत.
केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक असलेल्या पीएम किसान योजनेचे नियमही उद्यापासून बदलले जात आहेत. नवीन नियमानुसार, आता लाभार्थी केवळ त्याच्या आधार कार्डद्वारे पीएम किसान पोर्टलवर योजनेबद्दलची माहिती तपासू शकणार नाही. यासाठी आता त्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकही द्यावा लागणार आहे.
उद्यापासून देशातील लाखो व्यापाऱ्यांसाठी जीएसटीचे नियमही बदलणार आहेत. आता ५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना विवरणपत्र भरताना चार अंकी HSN कोड देणे बंधनकारक असेल. पूर्वी हा कोड दोन अंकी होता. यापूर्वी 1 ऑगस्टपासून 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना सहा अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…