Home उद्योग टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून ‘अर्थ डे’ निमित्त पुन्हा एकदा शाश्वत पर्यावरणासाठी आपली वचनबद्धता जाहीर

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून ‘अर्थ डे’ निमित्त पुन्हा एकदा शाश्वत पर्यावरणासाठी आपली वचनबद्धता जाहीर

15 second read
0
0
5

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून ‘अर्थ डे’ निमित्त पुन्हा एकदा शाश्वत पर्यावरणासाठी आपली वचनबद्धता जाहीर

 

 

‘अर्थ डे’ निमित्त यावर्षी संपूर्ण जग ‘अवर पॉवर, अवर प्लॅनेट’ या थीमनुसार एकत्रित येत असताना आम्हाला देखील या गोष्टीची जाणीव आहे कि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकावर आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या (टीकेएम)  मूलभूत मूल्यांमध्येच ही जबाबदारी समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तयार करत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिफाईड वेहिकल टेक्नॉलॉजी (xEVs*) विकसित करत आहोत, ज्यामध्ये पर्यायी इंधनावर चालणाऱ्या पॉवरट्रेन्सचा(वाहनांचा) समावेश आहे. या प्रयत्नांत आम्ही अनेक मार्गानी काम करत आहोत, त्याचबरोबर अक्षय ऊर्जेचा(रिनिवेबल एनर्जी) वापर करून सामूहिक शाश्वत उपक्रमांचे नेतृत्व करत आहोत जेणेकरून पर्यावरणदृष्ट्या सक्षम जग घडवता येईल. जागतिक पातळीवर 2015 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या टोयोटाच्या ‘इन्व्होर्मेन्टल चॅलेंज 2050’ (चॅलेंज 1-6) शी सुसंगत राहून, आम्ही टीकेएममध्ये उत्पादनांच्या पलीकडे जाऊन मॅनुफॅक्चरिंग प्रक्रियेत आणि संपूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये शाश्वत पद्धतींचा समावेश करत कार्बन-न्यूट्रल बनण्याकडे आमचा प्रवास वेगाने पुढे नेत आहोत.

या सहा  इन्व्होर्मेन्टल चॅलेंजमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

➢ चॅलेंज 1: न्यू वेहिकल झेरो CO2 एमिशन्स चॅलेंज  (ग्रीन मोबिलिटी)

➢ चॅलेंज 2: लाईफसायकल झिरो CO2 एमिशन्स चॅलेंज (ग्रीन सप्लाय चेन, इको डीलरशिप अँड ग्रीन लॉजिस्टिक्स)

➢ चॅलेंज 3: प्लांट झिरो CO2 एमिशन्स चॅलेंज (रिनीवेबल एनर्जी सप्लाय, विजेचा कमी आणि कार्यक्षम वापर)

➢ चॅलेंज 4: पाण्याचा वापर कमी करणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे (4R- रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिचार्ज)

➢ चॅलेंज 5: पुनर्वापरावर आधारित समाज आणि प्रणाली निर्माण करणे (संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर, वेस्ट टू व्हॅल्यू मॅनेजमेंट-कचरा व्यवस्थापन आणि लाईफ झालेल्या वेहिकलची योग्य विल्हेवाट)

➢ चॅलेंज 6: निसर्गासोबत सुसंवाद असणारा समाज निर्माण करणे (टोयोटा ग्रीन व्हेव अँड टुडे फॉर टुमारो प्रोजेक्ट्स – वृक्षारोपण मोहिमा, पर्यावरण शिक्षण केंद्र – एकोझोन)

 

वरीलपैकी 1 ते 3 चॅलेंज हे आमच्या टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रोजेक्ट आणि ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सवर आधारित आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन जवळजवळ शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही वाहनाच्या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेत – कच्च्या मालाच्या निर्मितीपासून ते वाहतुकीपर्यंत, वाहनाच्या जोडणीपासून उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेपर्यंत आणि अक्षय ऊर्जेच्या वापरापर्यंत – कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देतो. याशिवाय चॅलेंज 4 ते 6 अंतर्गत आम्ही पाण्याचा वापर कमी करणे, पुनर्वापरावर आधारित समाज उभारणे आणि निसर्गासोबत सुसंवाद राखणारा समाज घडवण्यावर काम करत आहोत. आज आमचे संपूर्ण उत्पादन 100% रिनीवेबल एनर्जी ग्रीडवर चालते; आमच्याकडील 96% पेक्षा अधिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येतो आणि आमच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्यापैकी 89.3% पाणी पावसाचे साठवलेले पाणी असून त्यातही पुनर्वापर पद्धतीचा समावेश आहे – यामुळे आम्ही झिरो कार्बन, झिरो लिक्विड डिस्चार्ज आणि झिरो वेस्ट टू लँडफिल (कार्बन उत्सर्जन नाही, सांडपाणी नाही, डंपिंगमध्ये कचरा नाही) यांचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहोत.

टोयोटा ग्रीन व्हेव प्रकल्पाअंतर्गत, मियावाकी पद्धतीने आतापर्यंत 3,28,000 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे परिसंस्था पुन्हा निर्माण झाली असून 790 हून अधिक स्थानिक झाडांच्या जाती आणि 400 हून अधिक प्राणी व पक्ष्यांच्या जाती आमच्या कारखान्याच्या परिसरात नांदत आहेत. गेल्या वर्षात आमच्या परिसराबाहेर 8,000 हून अधिक झाडे लावण्यात आली, जेणेकरून आपला हरित परिसर आणखी वाढवता येईल. एकोझोन हे आमचे 25 एकर जागेतील अनुभवाधारित पर्यावरण शिक्षण केंद्र असून त्यामार्फत 40,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व इतर सहभागी सदस्यांना पर्यावरणाविषयी माहिती आणि प्रोत्साहन मिळाले आहे, सकारात्मक बदल घडून आला आहे ज्यातून पर्यावरण संरक्षक घडत आहेत.

2035 पर्यंत आम्ही ‘कार्बन-न्यूट्रल मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया’ पूर्णपणे लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आम्ही ऊर्जेचा कार्यक्षम वापर, शाश्वत साहित्याचा वापर, पर्यावरणीय नियमांचे पालन आणि क्लीनर टेक्नॉलॉजीचा वापर या गोष्टींवर भर देत आहोत – हे सर्व एकत्रितपणे पर्यावरणावर होणारा हानिकारक परिणाम कमी करत आहेत. या सर्व उपक्रमांव्यतिरिक्त, आम्ही आमचे चांगले पर्यावरणीय उपाय आमच्या पुरवठादारांशी, डीलर्सशी, लॉजिस्टिक्स भागीदारांशी आणि समाजातील सदस्यांशी शेअर करत आहोत जेणेकरून आमच्या कारखान्याबाहेरही पर्यावरणावर चांगला प्रभाव पडावा. भारत ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, क्लीन मोबिलिटी सोल्युशन देण्याप्रती ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. पुढील काळात आम्ही अशी चळवळ उभी करण्याचे ध्येय बाळगतो जिथे प्रत्येक प्रयत्नाला अर्थ असेल, प्रत्येक व्यक्तीचा आवाज महत्त्वाचा असेल आणि प्रत्येक कृती एक स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पृथ्वी घडवण्यासाठी हातभार लावेल.

xEVs मध्ये स्ट्रॉंग हायब्रीड इलेक्ट्रिक वेहिकल (SHEVs), प्लग इन हायब्रीड इलेक्टिक वेहिकल (PHEVs),बॅटरी इलेक्ट्रिक वेहिकल(BEVs), फ्युएल सेल इलेक्ट्रिक वेहिकल(FCEVs), इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स-फ्युएल वेहिकल(EFFV) यांचा समावेश होतो.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री…