
no images were found
टॉमी हिलफिगर मुंबईत दाखल: स्टायलिश इन-स्टोअर गप्पा आणि ताऱ्यांच्या मांदियाळीत बॉलिवुड डिनरसह फॅशन, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सोहळा
टॉमी हिलफिगर, या PVH Corp. [NYSE: PVH] चा भाग असलेल्या ब्रँडने श्री. टॉमी हिलफिगर यांच्या भारतातील मुंबई भेटीची माहिती दिली. १५ एप्रिल २०२५ रोजी जगातील एका सर्वाधिक दमदार आणि स्टायलिश शहरात श्री. हिलफिगर यांनी फॅशन, सांस्कृतिक आदानप्रदान आणि संपर्क असा उत्साही दिवस व्यतित करत या ब्रँडची ओळख अधोरेखित केली.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या मुंबईतील लक्झ्युरी शॉपिंग भागात असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथील टॉमी हिलफिगरच्या स्टोअरला भेट देऊन या दिवसाची सुरुवात झाली. भारतातील सर्जनशील व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या सारा-जेन डायस आणि बॉलिवुड अभिनेत्री, मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्त्या मानुषी छिल्लर यांच्यासोबत श्री. हिलफिगर यांचे चर्चासत्र झाले. या चर्चेत स्टाईल, फॅशन आणि जागतिक प्रभाव यातून अमेरिकन आणि भारतीय फॅशन संस्कृतीचा संगम यासंदर्भात विचार मांडण्यात आले.
त्यानंतर, संध्याकाळी श्री. हिलफिगर यांनी ख्यातनाम ताज महाल पॅलेस हॉटेलमधील ताज चेंबर्स येथे रात्रीच्या स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. गेटवेचे सुंदर दृश्य आणि क्षितिजापर्यंत पसरलेल्या अरबी समुद्राच्या साक्षीने यावेळी संस्कृती, ग्लॅमर आणि स्टाईलचा छोटेखानी सोहळाच साजरा झाला. सांस्कृतिक अभिरुची जपणाऱ्या भारतातील आघाडीच्या व्यक्तींचा यात समावेश होता. ख्यातनाम बॉलिवुड सेलिब्रिटी आणि फॅशनमधील आघाडीच्या कंपन्यांचे ए-लिस्ट सेलिब्रिटी, मिडियातील आघाडीच्या व्यक्ती तसेच या उद्योगक्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या. करण जोहर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, आदित्य रॉय कपूर, शिखर धवन आणि गुरु रंधावा यावेळी उपस्थित होते.
या ब्रँडप्रमाणे ठळक, उत्साही वातावरण आणि स्थानिक वैशिष्ट्यांची जोड अशा सुंदर मिलाफातून ही संध्याकाळ म्हणजे फॅशन, सर्जनशीलता आणि भारतातील आकर्षक स्टाईल आणि मनोरंजन क्षेत्राशी टॉमी हिलफिगरचे संबंध अधिक दृढ करण्याचा एक अनोखा सोहळा ठरली.