Home शासकीय बगीचाच्या आरक्षणामधील बाधित होणारे 11 विनापरवाना शेड हटविले

बगीचाच्या आरक्षणामधील बाधित होणारे 11 विनापरवाना शेड हटविले

7 second read
0
0
6

no images were found

बगीचाच्या आरक्षणामधील बाधित होणारे 11 विनापरवाना शेड हटविले

कोल्हापूर (प्रतिनिधी):- बी वॉर्ड, रि.स.न.770 ही मिळकत आरक्षण क्रमांक 251 बगीच्यासाठी आरक्षित आहे. या आरक्षीत जागेमधील जागा मालकांपैकी रणजीत साळुंखे यांनी 11 विनापरवाना शेड उभाकरून ती भाड्याने दिले होती. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम  १९६६ चे कलम 53 (1) अंतर्गत दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी नोटीस लागू करण्यात आली होती. या जागेवरील विनापरवाना बांधण्यात आलेले शेड काढून घेण्यास समज देण्यात आली होती. सदर शेडचे  विनापरवाना बांधकाम काढून न घेता रणजीत साळुंखे यांनी न्यायालयात रे.क. नं 840/2024 दावा दाखल केला होता. सदरच्या विनापरवाना शेडवर कारवाई करू नये म्हणून मनाई मिळणेस मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतू या नोटिसी संदर्भात दावा सुरू असल्याने पुढील कारवाईसाठी कायदेशीर अभिप्राय घेऊन न्यायालयाचा कोणताही मनाई हुकूम कोल्हापूर महानगरपालिका विरुद्ध नसल्याने 11 विनापरवाना उभारण्यात आलेले शेड आज काढण्यात आले. .

         सदरची कारवाई नगररचना, विभागीय कार्यालय क्र.1, विद्युत व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त मोहिमेद्वारे करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्तात विनापरवाना शेड उतरून घेण्यात आले. सदरची कारवाई सहाय्यक संचालक नगररचना विनायक झगडे व उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सुनील भाईक, चेतन आरमाळ व कर्मचाऱ्यांनी केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री…