Home शैक्षणिक दूरशिक्षण व ऑनलाईन  केंद्र सुट्टी दिवशी राहणार सुरु 

दूरशिक्षण व ऑनलाईन  केंद्र सुट्टी दिवशी राहणार सुरु 

15 second read
0
0
117

no images were found

दूरशिक्षण व ऑनलाईन  केंद्र सुट्टी दिवशी राहणार सुरु 

 कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची विविध अभ्यासक्रमाची प्रथम व  द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शनिवार  दि.१२ जुलै  व रविवार दि.१३ जुलै या सुट्टीच्या दिवशी  दूरशिक्षण  व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे मुख्य कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी दिली आहे.

       शैक्षणिक वर्ष २०२५ – २६  मधील बी.ए.,बी.कॉम.,एम.ए. (मराठी,हिंदी,इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास,) एम.कॉम.एम.एस्सी (गणित)  एम.बी.ए.(डिस्टन्स मोड ) व एम.कॉम.एम.एस्सी (गणित) एम.बी.ए.( ऑनलाईन मोड ) या अभ्यासक्रमाचे प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रवेश फॉर्म भरणेची प्रक्रिया सुरू आहे. या केंद्रामध्ये प्रवेश घेणारे बहुतांश  विद्यार्थी नोकरी करून शिक्षण घेणारे असल्याने सुट्टी दिवशी प्रवेश घेणे ,अभ्यासक्रमांची माहिती घेणे करिता या केंद्रामध्ये येत असतात.या कारणास्तव दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राचे कार्यालय शनिवार  दि.१२ जुलै   व रविवार दि.१३ जुलै रोजी शासकीय सुट्टी दिवशी मुख्य कार्यालय सुरू राहणार आहे,सदरची कार्यवाही  दि.१५ सप्टेंबर पर्यत राबविण्यात येणार आहे. तरी विद्यार्थी ,पालक ,अभ्यागत  व अभ्यासकेंद्र समन्वयक यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्र.संचालक यांनी डॉ.के.बी.पाटील  केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…