no images were found
शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय योग व निसर्गोपचार परिषदेचे आयोजन
कोल्हापूर(प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दि. 21 ते 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीयस्तर योग व निसर्गोपचार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मानव्यशास्त्र विभागाच्या सभागृहात संंपन्न होणाऱ्या या परिषदेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांनी केले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचा विषय योग व निसर्गोपचाराचे नवे आयाम असा आहे. यामध्ये देशभरातील विविध तज्ञ मार्गदशकांची व्याख्याने होणार असून योग, निसर्गोपचार, ॲक्यूप्रेशर, आहार, अशा विविध विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण ही होणार आहे. दरम्यान, योगाच्या विविध आसन व युध्दीक्रियेचे सादरीकरणही होर्इ्रल. मर्यादीत प्रवेशसंख्या असलेल्या या परिषदेसाठी योग, निसर्गोपचार, ॲक्यूप्रेशर अशा विविध विषयांच्या अभ्यासक, विद्यार्थी, डॉक्टर नागरीक, यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणीची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी पर्यंत आहे. सदर परिषदेसाठी निवासी व अनिवासी नोंदणी आहे. परिषदेची विस्तृत माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांशी संर्पक साधावा.