Home सामाजिक एचडीएफसी लाइफ आणि लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.ने केली कॉर्पोरेट एजन्सी हातमिळवणी

एचडीएफसी लाइफ आणि लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.ने केली कॉर्पोरेट एजन्सी हातमिळवणी

14 second read
0
0
20

no images were found

एचडीएफसी लाइफ आणि लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.ने केली कॉर्पोरेट एजन्सी हातमिळवणी

 

मुंबई : एचडीएफसी लाइफ हे भारतातील आघाडीचे विमाकर्ते आणि लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपेरेटिव्ह सोसायटी यांनी कॉर्पोरेट एजन्सी टाय-अप केला आहे. या हातमिळवणीमुळे लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपरेटिव्ह मल्टिपरपझ सोसायटी त्यांच्या ग्राहकांना एचडीएफसी लाइफची जीवन विमा उत्पादने वितरित करू शकणार आहे.

लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपेरेटिव्ह सोसायटीची स्थापना ऑगस्ट १९९५ मध्ये झाली आणि कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्लीमध्ये त्यांच्या २०० हून अधिक शाखा आहेत आणि त्यांच्यातर्फे गुंतवणुकीसाठी वैविध्यपूर्ण फायनान्शिअल प्रोडक्ट्स उपलब्ध करून देण्यात येतात.

भारतातील एका मोठ्या लोकसंख्येपर्यंत जीवन विमा पोहोचण्याची गरज आहे आणि हा टाय-अप हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. एचडीएफसी लाइफतर्फे व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमधील गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची जीवन विमा उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात. या नव्या भागीदारीच्या माध्यमातून एचडीएफसी लाइफ, जीवन विम्याची व्याप्ती वाढविण्यात अजून योगदान देऊ शकेल.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एचडीएफसी लाइफने ६८ दशलक्षांहून अधिक व्यक्तींना विमा संरक्षण देऊ केले आणि एकूण क्लेम सेटलमेंट ९९.७% इतका आहे.

या नव्या सहयोगाबद्दल  लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपेरेटिव्ह सोसायटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अभिजीत ए. दीक्षित म्हणाले, “एचडीएफसी लाइफ शी केलेला हा नवा टाय-अप हा आमच्या संस्थेचा महत्त्वाचा टप्पा जाहीर करताना मी रोमांचित झालो आहे. या सहयोगामुळे एक धोरणात्मक भागीदारी झाली आहे. आमचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना आम्ही प्रदान करत असलेल्या मूल्यांमध्ये वृद्धी करणे हे उद्दिष्ट आहे.

या सहयोगातून, अतुलनीय सेवा आणि ग्राहक लाभ देण्याचा आमचा निर्धार प्रतिबिंबीत होतो. एचडीएफसी लाइफशी भागीदारी केल्याने आम्ही उपलब्ध करून देत असलेली उत्पादने आमच्या क्लाएंट्सना वाढीव मूल्य व आधार देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ही भागीदारी हे आमच्या उत्कृष्टता साध्य करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. एचडीएफसी लाइफसह अधिक उंची साध्य करू आणि आमचे कर्मचारी व ग्राहकांचे सबलीकरण करू.”

एचडीएफसी लाइफचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश बदामी म्हणाले, “लोकमान्य मल्टिपरपझ को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ हे भारताचे व्हिजन साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले हे अजून एक पाऊल आहे. आमच्या वितरणाच्या क्षमतेचा उपयोग करून घेऊ शकू आणि आमच्या विमा उपाययोजना त्यांच्या संपूर्ण ग्राहकसंख्येपर्यंत नेऊन या भागादारीला अधिक मूल्य प्राप्त करून देऊ शकू, अशी आम्हाला आशा आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…