Home मनोरंजन ऐश्वर्या खरे साकारणार 6 वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका

ऐश्वर्या खरे साकारणार 6 वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका

11 second read
0
0
52

no images were found

ऐश्वर्या खरे साकारणार 6 वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका

 

झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ गेली दोन वर्षे आपली रोचक कथानक आणि लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) आणि रिषी (रोहित सुचांति) च्या आयुष्यातील चढउतारांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हल्लीच्या एपिसोड्‌समध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कशाप्रकारे गाडीने प्रवास करत असताना लक्ष्मीची गाडी दरीत कोसळते आणि गाडीचा विस्फोट होतो आणि त्यात ती मृत झाली आहे असे मानले जाते. लक्ष्मीच्या मृत्यूच्या बातमीने रिषी अक्षरशः उध्वस्त होतो. आता ह्या शोमध्ये 7 वर्षांची झेप पाहायला मिळणार असून लक्ष्मी आपली मुलगी पार्वती ऊर्फ त्रिशा सारडासह एका गावामध्ये राहताना दिसून येईल.

ह्या झेपेनंतर कथानकामध्ये नाट्‌यमय वळण येते. लक्ष्मी पंजाबमधील एका गावामध्ये आपली मावशी आणि 6 वर्षीय मुलीसोबत राहत आहे. ह्या परिवर्तनामुळे अभिनेत्री ऐश्वर्या खरेसाठी एक नवीन प्रवास सुरू होतो. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये ती प्रथमच आईची भूमिका साकारत आहे. आपल्या जबाबदाऱ्यांसह मातृत्व सांभाळत लक्ष्मी शेतात काम करताना दिसून येईल आणि त्याचसोबत स्थानिक शाळेमध्ये मुलांना शिकवण्याचे कामही करताना दिसेल. आपले काम आणि मातृत्व यशस्वीपणे सांभाळणारी एक कणखर आणि स्वतंत्र स्त्री च्या रूपात ती प्रेक्षकांना दिसून येईल.

ऐश्वर्या म्हणाली, लक्ष्मीने मला एक अभिनेत्री म्हणून प्रगल्भ होण्याची संधी प्रदान केली आणि त्यासाठी मी कायमच ऋणी असेन. आयुष्यभरासाठी लक्षात राहतील अशा अनेक गोष्टी ह्या शो ने मला शिकवल्या आहेत. ह्या शोमध्ये एका छोट्‌या मुलीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करत आई बनण्याची संधी मला मिळाली यापेक्षा अधिक रोमांचक काही असूच शकत नाही. एवढेच नाही तर मी शेतामध्ये काम करतानाशेताची देखभाल करताना आणि अशा अनेक गोष्टी करतानाही दिसून येणार आहे. माझा विश्वास आहे की ह्या झेपेमुळे आमच्या शोमध्ये नवीन आयाम आणि रोमांचक नाट्‌यमय वळणे प्राप्त होतील. प्रेक्षक अक्षरशः खुर्च्यांना खिळून राहतील. मी आशा करते की प्रेक्षक नेहमीप्रमाणे आमच्यावर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत राहतील.आपल्या नवीन प्रवासासाठी लक्ष्मी सज्ज असून आगामी भागांमध्ये तिच्या आई बनण्याच्या नवीन प्रवासाला पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितपणे रोचक ठरेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…