no images were found
महानगरपालिकेच्या महात्मा फुले विद्यालयास महाराष्ट्र विद्युत पारेषण कडून १३ स्मार्ट टि.व्ही.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्यावतीने सी.एस.आर.(CSR) फंडातून महापालिकेच्या फुलेवाडी येथील महात्मा फुले विदयालय या शाळेस रु.4 लाख किमतीचे 13 स्मार्ट टि.व्ही प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य अभियंता (परिमंडल) कराड, महाराष्ट्र राज्याच्या महापारेषण शिल्पा कुंभार या होत्या. हा कार्यक्रम सहा. आयुक्त विनायक औंधकर, अधीक्षक अभियंता महापारेषण कोल्हापूरचे प्रांजल कांबळे, कार्यकारी अभियंता अभिजित चंद्रकांत धमाले, स्वामिनी महिला संस्थाचे ऋग्वेदा माने, प्रशासनाधिकारी एस.के.यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राथ. शिक्षण समितीचे विजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना शिल्पा कुंभार यांनी सध्याचे युग हे संगणक व डिजीट्ल असल्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितपणे या स्मार्ट टिव्ही चा उपयोग होणार आहे. या स्मार्ट टिव्ही द्वारे अभ्यासक्रमातील विविध घटक हे व्हिडियो आणि ऑडीयोद्वारे प्रत्यक्ष विदयार्थ्यांना अनुभवता येणार आहे. शिक्षकांनी जास्तीत जास्त टिव्हीचा वापर करून विद्यार्थ्यांना याचा लाभ दयावा असे आवाहन केले. सहा.आयुक्त विनायक औंधकर यांनी डिजिटल ज्ञानाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना व्हावा. या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करावेत, स्मार्ट टिव्ही च्या माध्यमातून विदयार्थ्यांना साहजिकच अद्ययावत ज्ञान मिळणार आहे. त्याचा सर्व विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. प्रशासनाधिकारी एस.के. यादव यांनी बोलताना आज खऱ्या अर्थाने महात्मा फुले विद्यालय डिजीटल स्कूल झाले आहे. १३ स्मार्ट टिव्ही दिल्याने महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीचे त्यांनी आभार मानले. याचबरोबर मनपालिकेच्या गोविंद पानसरे विदयालयाच्या सहा. शिक्षिका सौ.माधुरी मातले यांनी यावेळी शाळेस प्रिंटर भेट दिला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता सूर्यवंशी, म्यु. गोविंद पानसरे विदयालयाच्या मुख्याध्यापिका आशालता कांजर, शांताराम सुतार शाळेतील सर्व शिक्षक कृष्णात यादव, आनंदा पाटील, शशिकांत कांबळे , उत्तम वाईंगडे, कुलदीप जठार, संतोष आंबेकर , माधुरी चिंचणे , राहुल बागडे, संतोष गोसावी, नितीन गाभाले. , सागर संकपाळ, श्वेता साळोखे , सेवक अनंत रावळजोगी तसेच भागातील पालक व नागरिक मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे, सूत्रसंचालन स्वाती चौगले तर आभार तुषार भापकर सर यांनी मानले.