no images were found
मणिपाल हॉस्पिटल्स बाणेरतर्फे करण्यात येणार नियमित मल्टी स्पेशॅलिटी ओपीडीजची सातार्यात सुरुवात
सातारा: आरोग्य सुविधा आता सातार्यातील लोकांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सातारा सुपरस्पेशॅलिटी पॉलिक्लिनिक च्या सहकार्याने मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर तर्फे नियमित ओपीडीज सातार्यात सुरु करण्यात येणार आहेत. मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा चमू आता दर महिन्याला सातार्याला जाऊन विविध आरोग्य समस्यांसाठी तज्ञ म्हणूनसल्ला आणि उपचार उपलब्ध करुन देणार आहेत. असे निदर्शनास आले आहे की सातार्यात अनेक रुग्ण हे गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजी आणि एन्डोक्राईन विकारांनी त्रस्त आहे त्याच बरोबर या भागात गॅस्ट्रो आणि एन्डोक्राईन विषयक समस्यांनी ग्रस्त रुग्णांसाठी तज्ञ उपलब्ध नाही,यासाठी मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेर कडून शहरात वैद्यकीय सल्ला आणि उपचार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. गॅस्ट्रोॲन्ट्रोलॉजी आणि एन्डोक्रोनोलॉजी व्यतिरिक्त आता रुग्णांना कार्डिओलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, न्युरोलॉजी, युरोलॉजी आणि हेमॅटोलॉजी सारख्या आजारांवरही वैद्यकीय सल्ला आणि उपचार उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमा विषयी माहिती देतांना पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल्स चे हॉस्पिटल डायरेक्टर डॉ. विजू राजन यांनी सांगितले“आजमितीस उपचारांना उशीर झाल्याने अधिकतर आरोग्य समस्या वाढतांना दिसतात त्याच बरोबर अनेक आजारात लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने आजार बळावतांना दिसतो. आरोग्यसुविधा उपलब्ध न होणे हे सुध्दा अडचणीचे ठरते, आरोग्य सेवा या उपलब्ध आणि वेळेत उपलब्ध होणेही महत्त्वाचे असते.
सातार्यात नियमित ओपीडी उपलब्ध करुन आम्ही स्थानिक नागरिकांना सध्याच्या आजारांवर उपचार उपलब्ध करुन देत आहोत. सातारा सुपरस्पेशॅलिटी पॉलिक्लिनिक बरोबरच्या सहकार्याने आणि अनुभव डॉक्टरांच्या मदतीने आम्ही अशा करतो की सातार्यातील लोकांना अनोखा आरोग्य अनुभव देऊन हे सुनिश्चित करत आहोत की प्रत्येक आरोग्य सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध असेल’’.