Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठाची विजयी घौडदौड

शिवाजी विद्यापीठाची विजयी घौडदौड

4 second read
0
0
110

no images were found

शिवाजी विद्यापीठाची विजयी घौडदौड

जबलपूर (मध्यप्रदेश)  येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष फुटबाॅल स्पर्धेत काल झालेल्या सामन्यांत शिवाजी विद्यापीठाने महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर संघाचा ५ गोलने पराभव करून विजयाची हॅटट्रिक केली.  सामन्याच्या सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठ संघाने खेळावर ताबा ठेवला. १२ व्या मिनीटाला सिध्देश साळोखेने मोठ्या डी बाहेरून मारलेला फटका संघाला १ गोलची आघाडी मिळवून गेला.  त्यानंतर आक्रमणाची धार कायम ठेवत २१ व्या मिनीटाला प्रथमेश बाटे याच्या पासवर केवल कांबळेने संघाचा दुसरा गोल केला. लगेचच ३८ व्या मिनीटाला सिध्देश साळोखेने वैयक्तिक दुसरा गोल करुन संघाला ३ -या गोलची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा पर्यंत हीच आघाडी कायम राहिली. मध्यंतरानंतर ५८ व्या मिनीटाला रोहित पोवारचे पासवर केवल कांबळेने वैयक्तिक २ रा व संघाचा ४ था गोल केला. तर ६८ व्या मिनीटाला प्रथमेश बाटे याच्या पासवर बदली खेळाडू निरंजन कामतेने ५ वा गोल करुन शिवाजी विद्यापीठ संघास ५ गोलने विजय मिळवून दिला. संघाचा कर्णधार प्रतिक बदामे, रोहित देसाई, स्वयम साळोखे, प्रथमेश बाटे यांनी चांगला खेळ केला.  उदया या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा सामना भूपाल नोबेल विद्यापीठ, उदयपुर ( राजस्थान ) संघाशी होणार आहे. 

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…