no images were found
प्रत्येक प्रवाशाची होणार कोरोना टेस्ट; राज्य सरकारचा निर्णय
चीनमध्ये सध्या कोरोनाचा पुन्हा आकडा कहर माजवला आहे. चीननंतर इतर देशांसह भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट करण्यात आलेले आहे. टेस्टिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून राज्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी इतर देशातून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर टेस्टिंग करण्याचे आदेशही दिले आहेत. केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्यास सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोग्य विभाग खबरदारी घेत असून टेस्टिंग डिपार्टमेंट तयारीत असल्याची माहितीही राज्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. फक्त चीनमधूनच नव्हे तर आपल्या देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची विमानतळावर थर्मल टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आलेत. आपल्या देशातून कोणी परदेशात गेलं आणि परदेशातून आल्यावरही त्यांची टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही सावंत यांनी दिली. मास्क सक्तीसंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतनंतर निर्णय घेऊ, अशी माहितीही सांवत यांनी यावेळी दिली.