no images were found
सलमान खान तुला ट्रेलर दाखवायला हे केलं; गोळीबारानंतर लॉरेन्सच्या भावाची पोस्ट
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सलमान खानला याआधी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिलीय. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईने हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं सांगताना सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. त्या पोस्टमध्ये सलमानच्या घरावर गोळीबार का केला? हे सांगताना हा ट्रेलर असून पहिली आणि शेवटची वॉर्निंग असल्याचं म्हटलं आहे.
सलमान खानच्या घरावर पहाटे पाच वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या ठिकाणी एकूण 6 राऊंड फायर केले गेले. त्यातील एक गोळी सलमान खानच्या गॅलरीमध्ये मारण्यात आली होती. भिंतीत गोळी घुसल्याचं आढळून आलंय. तसंच घटनास्थळी रिकाम्या पुंगळ्यासुद्धा सापडल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि एक टीम तांत्रिक तपास करत आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सोशल मीडियावरून हा हल्ला आपणच केला असल्याचं सांगणारी पोस्ट केलीय. त्यात म्हटलं आहे की, अन्यायाविरुद्धचा निर्णय जर लढाईने होणार असेल तर लढाई योग्य. सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं. तुला समजावी आमची ताकद. आता आणखी परीक्षा घेऊ नकोस. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग असा इशारासुद्धा पोस्टमध्ये दिला आहे.
जाहिरात
ज्या दाऊद इब्राहिम आणि शोटा शकीलला तू देव मानलं आहेस त्याच्या नावाचे दोन कुत्रे आम्ही पाळले आहेत. बाकी जास्त बोलण्याची मला सवय नाही. जय श्रीरान, जय भारत अशी पोस्ट अनमोल बिश्नोईने केलीय. त्यासोबतच गोल्डी ब्रार, रोहित गोडरा आणि काला जठारी यांचीही नावे पोस्टमध्ये लिहिली आहेत.
लॉरेन्सने सलमानला दिली होती धमकीगँगस्टर लॉरेन्स विश्नोईने अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानने बिश्नोई समाजाच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली असून या समाजाच्या भावना दुखावल्या होत्या, त्यामुळेच सलमानवर अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने केला आहे. 2018 मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. कोर्टात हजेरी लावताना बिश्नोईने सलमान खानला जोधपूरमध्ये मारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.