
no images were found
एचडीएफसी बँक परिवर्तन 2025 पर्यंत 1000 खेड्यांना स्वच्छ अक्षय ऊर्जा उपायांपर्यंत पोहोच देऊन सक्षम करणार
मुंबई, : जगभरात वसुंधरा दिन 2025 साजरा होत आहे आणि त्याच वेळी, एचडीएफसी बँक आपल्या परिवर्तन या महत्त्वाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत एक लक्षणीय सिद्धी जाहीर करून शाश्वत प्रगतीविषयीच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहे. ही बँक 2025 पर्यंत देशभरातील 1000 पेक्षा जास्त खेड्यांना स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा उपायांपर्यंत पोहोच प्रदान करेल आणि अशाप्रकारे, नावीन्यपूर्ण सोलर-संचालित इन्फ्रास्ट्रक्चर, जागरूकता आणि स्थानिक भागीदारी यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि निम-शहरी समुदायांना सक्षम करेल.
अक्षय ऊर्जेच्या बाबतीतील या बँकेचे कार्य ‘अवर पॉवर, अवर प्लॅनेट’ या यंदाच्या वसुंधरा दिनाच्या थीमशी साधर्म्य दाखवणारे आहे. या थीममधून स्वच्छ ऊर्जेचा अंगिकार करण्याचे प्रमाण वाढवण्याचे जागतिक आवाहन करण्यात आले आहे. आपल्या ‘नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट’च्या स्तंभाखाली एचडीएफसी बँक परिवर्तनने 61,655 पेक्षा जास्त सोलर स्ट्रीटलाइट 22 राज्यांमध्ये स्थापन केले आहेत. याशिवाय मार्ग सुरक्षा ते पेय जल, शेतकी, फूड प्रोसेसिंग आणि उपजीविका वाढवण्यासारखे अनेक सोलर उपक्रम देखील त्यांनी लॉन्च केले आहेत, जे ग्रामीण जीवनास फायदेशीर ठरत आहेत.
केवळ इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नाही, हे ओळखून एचडीएफसी बँकेने निम-शहरी भारतात सौर ऊर्जेच्या अंगिकार करण्यातील रहस्यमयता दूर करण्यासाठी सोलर शिक्षा हा जागरूकता उपक्रम विकसित केला आहे. सोलर शिक्षा उपक्रमात जागरुकतेचा अभाव, प्रक्रियेतील अडथळे आणि सोलरचा अवलंब करण्यापासून रोखणारे समज यावर उपाययोजना करण्यात येते. हा प्रोग्राम महत्त्वाचे शिखण आणि प्रात्यक्षिक प्रदान करतो तसेच सरकारी योजना आणि सब्सिडीबाबतची माहिती देखील देतो. विविध प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक साहित्य पुरवून, हा प्रोग्राम विविध समुदायांपर्यंत पोहोचतो आणि त्यांची समज वाढवण्याचे कार्य करतो.
आजपर्यंत गोवा, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड सारख्या राज्यामधील 90 पेक्षा जास्त जागरूकता कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामधून 450+ समुदायांतील 3000 पेक्षा जास लोक प्रभावित झाले आहेत. हा प्रोग्राम शाळा, सार्वजनिक हॉस्पिटल्स, अनाथालये, कृषी समुदाय आणि वृद्धाश्रम यांसारख्या स्थानांपर्यंत पोहोचला आहे, जेथे सोलरचा जीवनमानावर थेट प्रभाव पडणे शक्य आहे. हा प्रोग्राम सोलर पंप, पॅनल्स, कूकर्स, शेगड्या, स्ट्रीटलाइट्स आणि वॉटर हीटर्स सारख्या विविध सोलर उपाययोजनांचा अंगिकार करण्यासाठी प्रचार करतो.
आपल्या उपक्रमांविषयी बोलताना एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनिजिंग डायरेक्टर कैझाद भरूचा म्हणाले, “एचडीएफसी बँकेत, आमचा विश्वास आहे की, शाश्वत भविष्याकडे जाणारा रस्ता समावेशक विकासात दडलेला आहे. परिवर्तनच्या छत्राखालील आमचे सौर ऊर्जा उपक्रम संधी निर्माण करण्याबरोबरच रस्ते आणि घरे उजळण्यासारखे प्रत्यक्ष आणि मोजता येण्याजोगे मोठे फरक घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. जागरूकता, इनोव्हेशन आणि सामुदायिक मालकीवर लक्ष केंद्रित करून आम्ही अशा भविष्यात गुंतवणूक करत आहोत, जे समतापूर्ण, लवचिक आणि हरित असेल. वसुंधरा दिनी, देशभरात अशी प्रभावी मॉडेल्स वाढवण्याबाबतच्या आमच्या वचनबद्धतेची आम्ही पुष्टी करतो.”
एचडीएफसी बँकेतील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रमुख नुसरत पठाण म्हणाले, “आम्ही हे जाणतो की, सौर ऊर्जेचे लोकशाहीकरण हे तांत्रिक उपाययोजनांच्या पुढे जाते. आमची वचनबद्धता इन्फ्रास्ट्रक्चर विकासाच्या पलीकडे जाऊन ज्ञान-प्रेरित फ्रेमवर्कच्या निर्मितीवर केंद्रित आहे. एक असे फ्रेमवर्क जे दीर्घकालीन, समुदाय-प्रेरित ऊर्जा स्वातंत्र्य सक्षम बनवते.”