Home Uncategorized ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन !

‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन !

20 second read
0
0
10

no images were found

 

‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन !

 

नागपूर – नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा सपशेल पराभव करून ऐतिहासिक विजय संपादन करणार्‍या हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा संत-महंत, समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत १९ डिसेंबरला नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा झाशी राणी चौक, नागपूर येथील ‘विदर्भ साहित्य संघा’च्या सभागृहात सायंकाळी ५.३० ते रात्री ८ पर्यंत या कालावधीत होणार आहे. ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक तथा ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. ते टिकळ पत्रकार भवन, नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

        या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वय श्री. श्रीकांत पिसोळकर, नागपूर येथील श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त श्री. रामनारायण मिश्र, ‘श्री पंचमुखी हनुमान मंदिरा’चे विश्वस्त श्री. दिलीप कुकडे, ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. राहूल पांडे आणि भाजपचे श्री. अनिल शर्मा हे उपस्थित होते. 

       या कार्यक्रमासाठी म्हणून शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मंत्री सर्वश्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम, आशिष जयस्वाल, तर भाजपचे मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नीतेश राणे, अतुल सावे, आकाश फुंडकर, संजय सावकारे, पंकज भोयर, तसेच शिवसेनेचे आमदार सर्वश्री प्रदीप जयस्वाल, चंद्रकांत सोनावणे, अमोल खताळ, बालाजी किणीकर, तर भाजपचे आमदार सर्वश्री मंगेश चव्हाण, सुनील कांबळे, सत्यजित देशमुख, अतुल भातखळकर, प्रतापराव अडसर, महेश लांडगे, सुरेश भोळे, शंकर जगताप, सचिन कल्याणशेट्टी, नारायणराव कुचे, संजय केळकर, कालीदास कोळंबकर, सुभाष देशमुख यांच्यासह अनेक विजयी आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनाही महासंघाच्या वतीने नागपूर येथील विधान भवनात प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. चांगला कार्यक्रम घेतल्याची प्रतिक्रिया मा. मुख्यमंत्र्यांनी भेटीत व्यक्त केली. 

        या सोहळ्यासाठी नागपूर आणि विदर्भातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी ७०५७३६८८६० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात न…