Home राजकीय सीपीआर मधील ENT शस्त्रक्रिया विभागाचे रखडलेले नूतनीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे –  विजय जाधव 

सीपीआर मधील ENT शस्त्रक्रिया विभागाचे रखडलेले नूतनीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे –  विजय जाधव 

8 second read
0
0
28

no images were found

सीपीआर मधील ENT शस्त्रक्रिया विभागाचे रखडलेले नूतनीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे –  विजय जाधव 

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोर-गरीब नागरिकांसाठी आधारवड असणारे रुग्णालय म्हणून सी.पी.आर रुग्णालय ओळखले जाते. ग्रामीण भागातील नागरिक या रुग्णालयाला थोरला दवाखाना म्हणून ओळखतात. कोविड काळात सी.पी.आर. मध्ये म्युकरमायकोसिसच्या महाराष्ट्रात विक्रमी २५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने या सीपीआर रुग्णालयाला 40 कोटींचा निधी मिळालेला आहे. यातून सध्या सोयीसुविधा व दुरुस्तीची कामे रुग्णालयात सुरु आहेत. सीपीआर मध्ये एकूण ११ ऑपरेशन थिएटर आहेत या पैकी ५ ऑपरेशन थिएटरमध्ये नूतनीकरणाची कामे चालू आहेत. उर्वरित ६ ऑपरेशन थिएटर मध्ये स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग, युरोलोजी, ट्रॉमाकेअर, सर्जरी व ऑर्थो तसेच १ थिएटर आपतकालीन परिस्थितीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. परंतु, अडीच महिने उलटून देखील या ऑपरेशन थिएटरचे काम अद्यापही प्रलंबित आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे याच संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सीपीआर चे अधिष्ठाता डॉ एस.एस मोरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित बांधकाम विभागाचे अधिकारी आशिष पाटील, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, डॉ. अजित लोकरे उपस्थित होते यांना प्रलंबित कामे विषयी जाब विचारला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, सी.पी.आर. रुग्णालयात जिल्ह्यातील काना-कोपऱ्यातुन रुग्ण येत असतात. ENT विभागामध्ये रोज ओपीडी विभागात १०० ते १२० पेशंट येत असतात. याठिकाणी १६ ते १७ रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट होत असतात. खाजगी दवाखान्यात टॉन्सिल, नाकाच्या हाडाचे ऑपरेशन, सायनस, कानाच्या पडदा ऑपरेशन, म्युकर माइकोसिस, थाइरोइड या शस्त्रक्रियांना २५ हजार पासून ६० हजार इतका खर्च करावा लागतो. हे दर सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण पैश्या अभावी खाजगी रुग्णालयात उपचार घेत नाहीत. रूग्णांना नवंसंजीवनी असणाऱ्या रुग्णालयात ऑपरेशन थिएटरच बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच शस्त्रक्रिया करायची आहे पण थिएटरच बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना दुखणे अंगावर काढावे लागत आहे. त्यामुळे ऑपरेशन थिएटर वेळेत सुरू न होण्याला जबाबदार कोण असा सवाल जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केला. तसेच ENT विभागाचे ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा अन्यथा भाजपा याविषयी तीव्र आंदोलन करेल.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, सीपीआर रुग्णालय हे गोर-गरीब जनतेचे आधारवड असलेले रुग्णालय म्हणून ओळखले जाते. ENT विभागाचे नुतनीकरणाचे काम अडीच महिने उलटून देखील या ऑपरेशन थिएटरचे काम अद्यापही प्रलंबित आहे. यासर्व गोष्टींचा त्रास सर्वसामन्य जनतेला होत असून याला जबाबदार सीपीआर रुग्णालय ठरत आहे. त्याच बरोबर उपस्थित बांधकाम विभागाचे अधिकारी आशिष पाटील यांना ENT विभागाचे नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अशा सूचना यावेळी केल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, सुरज सनदे यांनी अन्य सीपीआर रुग्णालयातील चालू असलेल्या गैर कारभारा बाबत तक्रारी निदर्शनास आणून दिल्या.

यावेळी सरचिटणीस गायत्री राऊत, डॉ सदानंद राजवर्धन, राजू मोरे, विराज चिखलीकर, गणेश देसाई, माधुरी नकाते, भरत काळे, रोहित पवार, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगला निपाणीकर, प्रदीप उलपे, गिरीश साळोखे, अनिल कामत, प्रग्नेश हमलाई, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, धीरज पाटील, रविकिरण गवळी, डॉ कौस्तुभ वाईकर, डॉ शिवानंद पाटील, सचिन पोवार, विश्वास जाधव, दिलीप बोंद्रे, बंकट सूर्यवंशी, प्रसाद पाटोळे, श्वेता गायकवाड, प्रणोती पाटील, शोभा कोळी ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…