Home आरोग्य जसलोक हॉस्पिटलमध्येएकाच वेळी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया आणि यकृतप्रत्यारोपण 

जसलोक हॉस्पिटलमध्येएकाच वेळी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया आणि यकृतप्रत्यारोपण 

20 second read
0
0
10

no images were found

 जसलोक हॉस्पिटलमध्येएकाच वेळी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया आणि यकृतप्रत्यारोपण 

 

 

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एक अत्यंत महत्त्वपूर्ण विलक्षण वैद्यकीय यश साध्य केले आहे श्री. बाबू मायकल या 63 वर्षीय रुग्णावर एकाच वेळी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया आणि  मेंदू मृत दात्याने अवयव दान केले यकृत प्रत्यारोपण (डीडीएलटी) यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. भारतात पहिल्यांदाच अशी जटिल दुहेरी प्रक्रिया पार पडली आहे.  या उपलब्धी मध्ये विविध तज्ञांचा सहभाग, प्रगत शस्त्रक्रियात्मक तंत्रे आणि रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक तत्परता हे घटक लक्षणीय आहेत. तसेच या प्रकरणातून जागतिक स्तरावर वाढत असलेल्या हृदयाशी संबंधित आणि यकृत रोगांचे व्यवस्थापन करण्याचे वाढते आव्हान देखील अधोरेखित झाले आहे.

        श्री. मायकल यांचा वैद्यकीय प्रवास सात वर्षांपूर्वी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) शी संबंधित सिरोसिसच्या निदानाने सुरू झाला. ही समस्या भारताच्या एक तृतीयांश लोकसंख्येला प्रभावित करणारी आणि यकृताच्या कर्करोगाला वाढणारी आहे. 2021 मध्ये, त्यांनी यकृताच्या कर्करोगासाठी फोकस्ड रेडिएशन थेरपी (एसबीआरटी) केली, एप्रिल 2024 मध्ये त्यांना पुन्हा उपचाराची आवश्यकता होती. ट्यूमर अंशतः नियंत्रित असताना, त्यांच्या यकृताच्या कार्य कमी होऊ लागले, ज्यासाठी यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. त्यांच्या प्रत्यारोपणपूर्व मूल्यांकनादरम्यान, त्यांच्या डाव्या मुख्य कोरोनरी धमनीमध्ये मोठे ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. आपत्कालीन कार्डिओलॉजीचे सहयोगी संचालक डॉ. राहुल छाब्रिया यांनी असे सांगितले की कोरोनरी ब्लॉकेजेससाठी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यापूर्वी उपचार आवश्यक होते आणि त्यांच्यावर  अँजिओप्लास्टी करता येणार नव्हती कारण त्यांच्या डाव्या मुख्य वाहिनीची शरीरिक रचना जटिल होती आणि त्यामुळे त्यांचे यकृत प्रत्यारोपण पुढे ढकलले गेले असते. या परिस्थितीमुळे एक कठिण पेच निर्माण झाला: हृदयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्यारोपणाला उशीर केल्याने कर्करोगाच्या वाढीचा आणि यकृतामध्ये बिघाड होण्याचा धोका होता, तर  शस्त्रक्रिया करताना दोन्ही रोगांच्या एकत्रित परिणामामुळे लक्षणीय जोखीम निर्माण होऊ शकत होती.सुरुवातीला जिवीत दाता प्रत्यारोपण करण्याची योजना आखली गेली, परंतु काळजीपूर्वक मूल्यमापन केल्यानंतर, दात्याच्या आरोग्यास प्राधान्य देऊन आणि अशा जटिल प्रक्रियेदरम्यान प्राप्तकर्त्याच्या अस्थिरतेची संभाव्यता ओळखून, टीमने हा अनोखा निर्णय घेतला. कॅडेव्हरिक डोनेशनशी संबंधित अनिश्चितता आणि संभाव्य प्रतीक्षेचा कालावधी समजून घेऊन श्री. मायकल यांना (डीडीएलटी) साठी प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले.  47 वर्षीय मृत दात्याच्या कुटुंबाने निःस्वार्थ उदारता दाखवल्याने अनपेक्षितपणे आशा बळावली. त्या कुटुंबासाठी ही दुःखद घटना असली तरी त्यांचे सहकार्य श्री. मायकल यांच्यासाठी जीवनरक्षक ठरले. यामुळे रुग्णालयाची संसाधने जलदरित्या मिळवण्यास मदत झाली, तसेच अतिदक्षता विभाग आणि सामाजिक कार्यकत्यांनी दोन्ही शस्त्रक्रिया सुलभ करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.                            शस्त्रक्रिया सुरुवात हृदयरोगाचे शल्यविशारद सल्लागार डॉ. उपेंद्र भालेराव यांनी बिटिंग-हार्ट, ऑफ-पम्प बायपास शस्त्रक्रिया प्रक्रियेद्वारे केली. या तंत्राचा उद्देश सर्जिकल जोखीम कमी करणे आणि त्यानंतर प्रत्यारोपणासाठी श्री. मायकल यांची प्रकृती अनुकूल बनवणे असा होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात …