
no images were found
अभिनेता बेहजाद खान सलाबत खानच्या रूपात ‘तेनाली रामा’ मालिकेत दाखल
रोचक कथानक आणि कृष्ण भारद्वाजने दरबारी कवी तेनाली रामाचा केलेला अप्रतिम अभिनय यामुळे सोनी सबवर सुरू असलेली ‘तेनाली रामा’ मालिका घराघरात पोहोचली आहे. कथानकाला एक नवीन कलाटणी देण्यासाठी बेहजाद खान हा कलाकार सलाबत खानच्या भूमिकेत मालिकेत दाखल होत आहे. तो खलनायक आहे आणि त्याच्या आगमनामुळे कथानकात उलथापालथ होणार आहे. सलाबत खान हा बहामनी साम्राज्याचा एक मुत्सद्दी आणि चतुर शिपाई आहे. तो काही साधासुधा शत्रू नाही, तो एका मिशनवर निघालेला आहे. विजयनगर साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची त्याची योजना आहे.
आपल्या विचारपूर्वक चाली आणि आपल्या राज्याप्रतीची निष्ठा बाळगणारा सलाबत खान हा विजयनगर साम्राज्याविरुद्ध एकामागून एक होणारे हल्ले आणि कारस्थाने यांचा सूत्रधार आहे. त्याच्या आगमनामुळे तेनाली समोर एक शक्तिशाली आणि हुशार शत्रू उभा ठाकला आहे. त्या दोघांमधील संघर्ष आणि वाग्युद्ध आता सुरू होणार आहे.
प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम अभिनयाबद्दल ओळखला जाणारा बेहजाद खान या भूमिकेच्या माध्यमातून मालिकेत दाखल होऊन कथानकातील उत्कंठा नक्कीच वाढवणार आहे. तो म्हणतो, “सलाबत खान साकारणे हे एक आकर्षक आव्हान आहे. हा माणूस अत्यंत विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने पावले उचलतो. अशा व्यक्तिरेखा तुम्हाला तुमच्यातील क्षमता आणि मार्मिकता शोधण्यासाठी प्रवृत्त करतात. प्रेक्षकांना देखील हा अनुभव नक्की येईल. कथानक उलगडत जाईल तेव्हा कावेबाज सलाबत खानचे आगमन एक टर्निंग पॉइंट ठरेल, जे तेनालीची निष्ठा आणि ताकदीला आव्हान देईल.”बेहजाद खान कलाकार संचात दाखल झाल्यामुळे कथानकात बुद्धीचातुर्याच्या लढतीत रणनीती, संघर्ष आणि लवचिकता पणाला लागणार आहे.