no images were found
न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी प्रकल्प स्पर्धेत विजेते
कोल्हापूर (प्रतिनिधी न): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी यड्राव आयोजित राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत डिप्लोमा इंजिनिअरींग विभागाच्या ‘Shark Tank’ विभागात प्रथम क्रमांक पटकावला. Artificial Intelligence and Machine Learning (AiML) विभागातील द्वितीय वर्षाच्या पार्थ सुर्यवंशी आणि मंथन सोमदळे या विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले. त्यांनी ‘ AI Based Head Mouse using Python’ हा प्रकल्प सादर केला, जो विशेषकरून दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. सदर विद्यार्थ्यांना एआयएमएल विभागप्रमुख प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.