
no images were found
स्कोडा ने ऑल-न्यू स्कोडा कोडियक कार केली लाँच
कोल्हापूर ,: स्कोडा कायलॅक श्रेणीच्या यशस्वी लाँचनंतर स्कोडा ऑटो इंडिया आता त्यांची लक्झरी ४x४ एसयूव्ही कोडियकच्या ऑल-न्यू जनरेशनच्या लाँचसह स्पेक्ट्रकच्या दुसऱ्या बाजूस नवीन कारची घोषणा करत आहे. भारतात व जगभरात सेकंड जनरेशन असलेली नवीन कोडियक लक्झरी, सुधारणा, ऑफ-रोड क्षमता, ऑन-रोड गतीशीलता आणि सात-आसनी विविधतेच्या सिग्नेचर संयोजनासह भारतामध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याची कोडियाक स्पोर्टलाइन (एक्स-शोरूम)ची किंमत ₹ ४६,८९,००० आणि सेलेक्शन एल अँड के ची किंमत ₹ ४८,६९,००० आहे. बुकिंग्जना आजपासून सुरूवात, तसेच ग्राहक डिलिव्हरीजना २ मेपासून सुरूवात होईल
एर्गो फ्रंट सीट्समुळे लक्झरी स्टँडर्ड आणखी वाढला आहे, ९ एअरबॅग्ज, स्लाइडिंग पॅनोरॅमिक सनरूफ आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी ७२५ वॅट कॅन्टॉन साऊंड सिस्टमसोबत १३ स्पीकर्स व सब-वूफर यासह सुरक्षितता व आरामदायीपणाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच, रिअर विंडोजमधील रोलिंग सबब्लाइण्ड्स गोपनीयता आणि प्रवासी आरामदायीपणामध्ये अधिक वाढ करतात.
ऑल-न्यू कोडियक सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: मून व्हाइट, मॅजिक ब्लॅक, ग्रॅफाइट ग्रे, वेल्वेट रेड, रेस ब्ल्यू. याव्यतिरिक्त, सिलेक्शन एलअँडके व्हेरिएण्ट विशेष ब्रॉन्क्स गोल्ड रंगामध्ये उपलब्ध आहे आणि स्पोर्टलाइन विशेष स्टील ग्रे रंगामध्ये उपलब्ध आहे.