
no images were found
टाटा पॉवरने राज्यभरात हरित ऊर्जा परिवर्तनाची गती वाढवली
महाराष्ट्र: सार्वजनिक पायाभूत सोयीसुविधांना सौर ऊर्जा सक्षम बनवण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या उपक्रमाच्या समर्थनार्थ, टाटा पॉवरने राज्यभरात २३० पेक्षा जास्त सार्वजनिक संस्थांना यशस्वीपणे सौर ऊर्जा सक्षम बनवले आहे. हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलून टाटा पॉवरने एकूण जवळपास १०७ मेगावॅट शुद्ध ऊर्जा क्षमतेचे योगदान दिले आहे. सौर ऊर्जा सक्षम संस्थांमध्ये प्रमुख जिल्ह्यांमधील १०० रुग्णालये (३.६ मेगावॅट), ६४ शाळा (२ मेगावॅट) आणि ७२ सरकारी व इन्स्टिट्यूशनल इमारतींचा (१०० मेगावॅट) समावेश आहे.टाटा पॉवरची ही सर्व इन्स्टॉलेशन्स एकूण १.३ लाख टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन रोखत आहेत, ज्यामुळे होणारा प्रभाव २० लाख झाडे लावण्याइतका आहे.
हे प्रयत्न भारतातील शुद्ध ऊर्जा परिवर्तनाला सक्षम बनवण्याच्या आणि समुदायावर केंद्रित सस्टेनेबिलिटीचे समर्थन करण्याप्रती टाटा पॉवरच्या सर्वसमावेशक वचनबद्धतेचा एक भाग आहेत. देशातील सर्वात विश्वसनीय आणि जबाबदार ऊर्जा कंपन्यांपैकी एक, टाटा पॉवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक सुविधांना सौर ऊर्जा सक्षम बनवून, ऊर्जेसाठी येणारा खर्च कमी करण्यात, ऊर्जा विश्वसनीयतेमध्ये सुधारणा करण्यात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत करत आहे. ही कंपनी व्यावहारिक आणि पुढे वाढवली जाण्यायोग्य अक्षय ऊर्जा सोल्युशन्स देण्यासाठी सरकारी संस्थांसोबत मिळून काम करत आहे, अशा संस्था ज्या महाराष्ट्राच्या हरित विकास अजेंड्यामध्ये सार्थक योगदान देत आहेत.
टाटा पॉवरने संपूर्ण भारतामध्ये १.५ लाख सौर ऊर्जा इन्स्टॉलेशन्सचा टप्पा पार केला आहे, देशातील नंबर १ रुफटॉप सौर ऊर्जा कंपनी म्हणून टाटा पॉवरचे स्थान यामुळे अधिक मजबूत झाले आहे. जवळपास ३ गिगावॅटच्या एकूण संस्थापित रुफटॉप क्षमतेसह, ही कंपनी भारताच्या स्वच्छ ऊर्जा महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. टाटा पॉवर सोलरूफ व्यवसायाने ७०० पेक्षा जास्त शहरांमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. टाटा पॉवर सोलरूफ ग्राहकांना वीज बिलांवर ८०% पर्यंतची बचत, सौर मोड्यूलवर २५ वर्षांची वॉरंटी देते आणि त्यासोबतच या कंपनीने ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये ५७५ पेक्षा जास्त चॅनेल भागीदारांची एक मजबूत इकोसिस्टिम तयार केली आहे, ज्यामुळे अंतिम युजरपर्यंत विश्वसनीय वितरण आणि सेवा निश्चितपणे पोहोचवल्या जातात.