no images were found
मोनाली झाली न्यायाधीश, आईच्या प्रेरणेतून
सोलापूर : आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करुन ध्येयावरील फोकस न हटवता प्रयत्न करणारी व्यक्तीच ही ते लक्ष्य साध्य करु शकते. सोलापूरच्या मोनाली साधू गावडे यांनी ते दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत त्यांची कनिष्ठ न्यायाधीशपदी निवड झालीय. मोनाली यांनी शालेय शिक्षण हे सोलापूरच्या शांतीनिकेतन हायस्कुलमध्ये घेतलं. त्यानंतर लातूरच्या कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या लातूर पॅटर्नमुळे त्यांच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली. त्यांनी लातूरच्याच दयानंद विधी महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पुण्यातून यामधील पदव्यूत्तर शिक्षण घेतले.
मोनाली यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं होतं त्याचवेळी 2010 साली त्यांच्या आई रुक्मिणी गावडे यांचं अचानक निधन झाले . त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरलं. आपल्या यशाची प्रेरणा आईच असल्याचं त्यांनी सांगतात. भाऊ आणि वडिलांसह या शिक्षकांनीही या प्रवासात खंबीर साथ दिल्याचं त्यांनी सांगितलं.