
no images were found
कोल्हापुरची मनपा शाळा खाजगी शाळांना देते टक्कर
कोल्हापूर : महानगरांमध्ये खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी होती. एखाद्या महानरपालिकेच्या शाळेत आपल्या पाल्याला ॲडमिशन मिळालेच पाहिजे यासाठी पालकांनी केलेली धडपड आजकाल कुठे बघायला मिळत नाही. मात्र कोल्हापूरात हे घडलं आहे. फक्त याच वर्षी नाही, तर गेल्या काही वर्षात दरवर्षी या शाळेत ॲडमिशन मिळवण्यासाठी चक्क पालकांच्या रांगा लागलेल्या असतात. कोल्हापुरातील जरगनगर परिसरातील महागरपालिकेची श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेत दरवर्षी प्रवेशासाठी रांगा लागतात. गुढी पाडव्याच्या पहिल्याच दिवशी काही तासांमध्येच येथील ॲडमिशन फुल होतात. यावर्षी इथं ॲडमिशन मिळवण्यासाठी पालक शाळेच्या आवारात रांगा लावून उभे होते.
रात्रीच 9 नंतर पालकांनी शाळेच्या आवारात यायला सुरुवात केली होती. ही गर्दी वाढतच चालली होती. अखेर शाळा प्रशासनाकडून रात्री १च्या सुमारास आलेल्या पालकांना टोकन वाटप करून घरी जाण्याचे आवाहन करण्यात आलं. त्यानंतर गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत ॲडमिशन प्रक्रिया पार पाडण्यात आली.
महापालिकेच्या शाळेच्या या प्रगतीचे खरे शिल्पकार येथील शिक्षक आहेत. या शाळेत शिक्षक पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांची विशेष तयारी करून घेतात. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते चौथी टॅलेंट सर्च, जवाहर नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कुल, NMMS, गणित प्रज्ञाशोध अशा अनेक परीक्षांची तयारी देखील विशेष लक्ष देऊन शाळेच्या अतिरिक्त वेळेत करण्यात येते.’ शिक्षकांची शिक्षणाविषयी आणि विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ, पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी, अध्यायानात नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याचबरोबर इथं राबवण्यात येणारे नवीन उपक्रम यामुळे आमच्याशाळेकडं विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे’ असं शाळेच्या केंद्र मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी सांगितलं.