no images were found
केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली असून आता आणखी ४ टक्क्यांनी वाढवला आहे.
नवी दिल्ली : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवून ४२ टक्क्यांवर नेला आहे, अशी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. महागाई भत्त्यात वाढीसाठी सरकार १२,८१५ कोटी रुपये खर्च करणार आहे. आता महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो यापूर्वी ३८% होता. सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याबाबत आढावा घेते आणि महागाईच्या आधारावर महागाई भत्ता सुधारित केला जातो. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. महागाई भत्त्यासोबतच केंद्रीय पेन्शनधारकांना DR म्हणजेच महागाई सवलतीचा लाभ मिळेल. या दरवाढीनंतर पेन्शनधारकांना ३८% ऐवजी ४२% महागाई सवलत मिळेल. केंद्र सरकारने १ जानेवारी २०२३ पासून त्याची अंमलबजावणी केली. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी मार्च महिन्याच्या पगार वाढीसह मिळेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दर सहा महीण्यानी सुधारणा करण्याचा विचार करते.