
no images were found
एचडीएफसी बँक आणि सीईआरएसएआय तर्फे सेंट्रल केवायसी रेकॉर्ड रजिस्ट्री विषयी जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन
मोहाली, – एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके सह भारत सरकारची कंपनी असलेल्या सिक्युरिटायझेशन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन ॲन्ड सिक्युरिटी इंटरेस्ट (सीईआरएसएआय) यांनी दोघांनी एकत्रितपणे सेंट्रल केवायसी रेकॉर्ड रजिस्ट्री (सीकेवायसीआरआर) या विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचा उद्देश हा नो युवअर क्लायंट (केवायसी), ॲन्टी मनी लाँडरिंग (एएमएल) आणि सीकेवायसीआरआर साठी आवश्यक उपलब्ध असलेली केवायसी माहितीचा कसा उपयोग करावा या विषयी सर्वसमावेशक माहिती देणे हा होता. त्याच बरोबर सीकेवायसीआर माहितीचा वापर करण्याची प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक आर्थिक पध्दतींचा विकास करण्यासाठी तसेच फसवणूकीपासून व नकली मालमत्तांपासून कसा बचाव करावा या विषयी जागरुकता निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमाला संपूर्ण भारतातील विविध खाजगी, सार्वजनिक, सहकारी आणि एनबीएफसीच्या १०० हून अधिक अधिकार्यांनी भाग घेतला होता, यामध्ये भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, सीईआरएसएआय आणि एचडीएफसी बँकेच्या अधिकार्यांचा समावेश होता.
एचडीएफसी बँकेच कार्यकारी संचालक श्री भावेश झवेरी यांनी गेल्या काही वर्षांत सीईआरएसएआय ने केलेल्या प्रगती विषयी चर्चा केली आणि कशा प्रकारे ही संस्था ग्राहकांच्या केवायसी कागदपत्रे आणि माहिती साठी एकच संस्था ठरली आहे याची माहिती दिली. संस्थेकडे सध्या ७ हजारांहून अधिक रिपोर्टिंग संस्था नोंदणीकृत असून त्यांच्या माध्यमातून जवळजवळ १०० कोटी ग्राहकांची माहिती ही रिपोर्टिंग संस्थेकडून प्राप्त होऊ शकते. त्यांनी आरबीआय चे सेंट्रल नो युवर कस्टमर (सीकेवायसी) च्या वापरा मध्ये सहकार्य केल्या बद्दल आभार मानले.
सीईआरएसएआय चे एमडी आणि सीईओ श्री उमेश कुमार सिंग यांनी सुध्दा यावेळी भाषण केले आणि त्यांनी सीकेवायसीची कागदपत्रे ग्राहकांच्या ओळखीसाठी कशा प्रकारे पाठवायची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांनी हे सुध्दा समजावले की कशा प्रकारे ग्राहक सुध्दा त्यांचा सीकेवायसी नंबर कशा प्रकारे प्राप्त करुन घेऊ शकतात, मग ते केवळ मिस्ड कॉल देऊन किंवा सीईआरएसएआयच्या वेबसाईटवरुन कशा प्रकारे ते मिळूव शकतात याची माहिती दिली. श्री. सिंग यांनी मोहाली येथील बँक हाऊस मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल एचडीएफसी बँकेचे आभार मानले.
सीईआरएसएआय ला आपले रेकॉर्ड्स जमा करण्याच्या पध्दतीशी संबंधित समस्यांसह आरबीआयच्या केवायसी एएमएल विषयी नवीन मास्टर डायरेक्शन विषयी आणि कामातील समस्यां विषयीही यावेळी चर्चा करण्यात आली.