Home बँकिंग एचडीएफसी  बँकेने भारतातील वाढत्या एमएसएमई उद्योगांना सक्षम करण्यासाठी ‘Biz+ करंट अकाऊंट्स’ लॉन्च केले

एचडीएफसी  बँकेने भारतातील वाढत्या एमएसएमई उद्योगांना सक्षम करण्यासाठी ‘Biz+ करंट अकाऊंट्स’ लॉन्च केले

26 second read
0
0
11

no images were found

एचडीएफसी  बँकेने भारतातील वाढत्या एमएसएमई उद्योगांना सक्षम करण्यासाठी ‘Biz+ करंट अकाऊंट्स’ लॉन्च केले

मुंबई,: करंट अकाऊंट ठेवींच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या एचडीएफसी  बँक या भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकेने आपल्या Biz+ करंट खात्यांच्या शुभारंभाची घोषणा केली आहे, जो भारतीय व्यवसायांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला करंट खात्याच्या ऑफरिंग्जचा एक नवीन संच आहे. खात्यांच्या या श्रेणीचा उद्देश अगदी पहिल्या दिवसापासून संपूर्ण बँक ग्राहकापर्यंत आणून व्यवसायांना सक्षम करण्याचा आहे.

प्रत्येक Biz+ करंट खात्यात काही मूलभूत लाभ आहेत, जसे की, कॅश हँडलिंग सेवा, निर्बाध डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आणि समर्पित बँक / रिलेशनशिप मॅनेजर सपोर्ट तसेच व्यवसायांसाठी लागणाऱ्या सर्व बँकिंग गरजांवरच्या उपाययोजना आहेत.

बँकेच्या नवीन करंट खातेदारांसाठी या नवीन ऑफरिंगचे ठळक वैशिष्ट्य हे आहे की, यात व्यापक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे आणि पहिल्या वर्षी, पहिल्या दिवसापासून प्रमेन्ट प्रोटेक्शन विमा कव्हरेज मिळणार आहे. यामुळे व्यवसाय मालकांना कोणत्याही अनपेक्षित धोक्यांपासून आपल्या उद्योगासाठी संरक्षण मिळते.

Biz+ करंट खात्यांतर्गत बँकेने एक स्तरीय रचना दाखल केली आहे. यात चार ठळक प्रकार आहेत, जे व्यवसाय प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांसाठी आवश्यक त्या सेवा प्रदान करतात.

Biz Lite+ अकाऊंट हे अगदी व्यवसाय उभारणीच्या टप्प्यासाठी उपयुक्त खाते आहे, यामध्ये आहे:

खात्यातील बॅलन्सवर विनामूल्य 6X रोख जमा मर्यादा

कॉम्प्लिमेंटरी डेबिट कार्डसह कर भरण्यावर 5% पर्यंत बचत

विनामूल्य दुकान / पेमेंट प्रोटेक्शन विमा

वापरानुसार साऊंडबॉक्सवर मासिक भाड्यात सूट

 

Biz Pro+ अकाऊंट विकासाच्या टप्प्यात असलेल्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये आहे:

खात्यातील बॅलन्सवर विनामूल्य 10X रोख जमा मर्यादा

विनामूल्य दुकान / पेमेंट प्रोटेक्शन विमा

विशिष्ट दराने शून्य को-लॅटरल ओव्हरड्राफ्ट कर्ज

वापरानुसार PoS डिव्हाईसेसवर मासिक भाड्यात सूट

 

Biz Ultra+ अकाऊंट विस्ताराच्या टप्प्यातील व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये आहे:

खात्यातील बॅलन्सवर विनामूल्य 12X रोख जमा मर्यादा

BizPower क्रेडिट कार्डसह 1.3 लाख रु पर्यंत वार्षिक बचत

विनामूल्य दुकान / पेमेंट प्रोटेक्शन विमा

या प्रीफर्ड प्रोग्राम अंतर्गत बँकिंग सेवांवर विशेष ऑफर्स

 

Biz Elite+ अकाऊंट विविधीकरणाच्या टप्प्यातील व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये आहे:

खात्यातील बॅलन्सवर विनामूल्य 15X रोख जमा मर्यादा

या इम्पिरीया प्रोग्राम अंतर्गत बँकिंग सेवांवर विशेष ऑफर्स

विनामूल्य दुकान / पेमेंट प्रोटेक्शन विमा

कॅश मॅनेजमेंट सिस्टमसह 3,200 पिन कोड्समध्ये कलेक्शन

सर्व परदेशी रेमिटन्सवर शून्य विदेशी बँक शुल्क

 

वरील सर्व योजना प्रकारांसाठी, उत्पादन प्रकारानुसार अटी आणि शर्ती लागू आहेत

आपल्या आघाडीच्या स्थानास अनुसरून एचडीएफसी  बँकेने आपल्या ग्राहकांच्या यशाशी सुसंगत अशी Biz+ करंट अकाऊंट श्रेणी डिझाईन केली आहे. शिवाय, ही खाती उत्पादन, ट्रेडिंग, सेवा प्रदाते वगैरेसारख्या व्यक्तिगत व्यवसाय सेगमेन्ट अनुसार समयोजित होतात. त्यामुळे व्यवसायांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी क्षेत्र-विशिष्ट उपाययोजना प्रदान करतात.

प्रस्तुत लॉन्चविषयी बोलताना एचडीएफसी  बँकेचे कंट्री हेड- पेमेंट्स, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर फायनॅन्स आणि मार्केटिंग, श्री. पराग राव म्हणाले, “व्यवहार आधारित ऑफरकडून मूल्य-आधारित ऑफर देण्याकडे बँकेने केलेले हे धोरणात्मक परिवर्तन आहे. यामध्ये व्यवसाय आणि व्यक्तिगत बँकिंग गरजा या दोन्हीचा विचार करण्यात आला आहे. यावेळी आम्ही एक अधिक मॉड्यूलर, स्केलेबल आणि व्यवसाय जीवन चक्रातील टप्प्यांसाठी अनुरूप अशी ऑफर सादर केली आहे. आमची Biz+ अकाऊंट रेंज अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे की ती अनुकूलन साधते. यामध्ये डायनॅमिक मल्टीप्लायर लाभ आहेत, जे व्यवसायाच्या वाढीबरोबर वृद्धिंगत होतात, ज्यामुळे घर्षण होत नाही.”

Biz+ करंट अकाऊंट प्रकार वन बँक दृष्टिकोनाच्या अंतर्गत विविध लाभ ऑफर करतात आणि ते देशभरातील 9,455 पेक्षा जास्त शाखांमध्ये उपलब्ध असतील.

शिवाय, या नवीन Biz+ करंट अकाऊंट ऑफरिंगचा लाभ वर्तमान 45 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना मिळेल आणि एक अधिक व्यवस्थित आणि मूल्य-प्रेरित बँकिंग अनुभव घेता येईल. Biz+ अकाऊंट ऑफरिंग मार्फत ग्राहकांना लायबिलिटी उत्पादने, अॅसेट सोल्यूशन्स, डिजिटल पेमेंट्स आणि बिझनेस कार्ड्ससह सुलभ, व्यवस्थित आणि उच्च मूल्याच्या प्रस्तावांपर्यंत पोहोच मिळेल.

Biz+ करंट अकाऊंट रेंजच्या लॉन्चने व्यवसाय वाढीसाठी अधिक स्मार्ट, सर्वांगीण बँकिंग अनुभव प्रदान करून भारताच्या उद्योजकांच्या ईकोसिस्टमला प्रोत्साहन देण्याच्या एचडीएफसी  बँकेच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान

  ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्…