no images were found
यंदा दिवाळीत सूर्य ग्रहण असल्याने लक्ष्मी पूजन २४ ऑक्टोबरला
कोल्हापूर : सर्वजण या दिपोत्सवाची आतुरतेने वाट पाहातआहेत. अधर्मावर धर्माचा विजय म्हणून मोठ्या उत्साह अन् जल्लोषात दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी केले जाणारे लक्ष्मीपूजन हे सुर्यास्तानंतर केले जाते. त्यामुळे 24 ऑक्टोबरलाच महालक्ष्मीची पूजा करावी असे धर्म अभ्यासक पं. धारणे यांनी सांगितले आहे.
यंदा दिवाळीच्या पर्वात सुर्यग्रहण असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवाळी नेमकी कधी साजरी करावी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दिवाळीचे लक्ष्मीपूजन कधी करावे यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
यावर्षी 24 ऑक्टोबर व 25 ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत. यावर्षी लक्ष्मीपूजन सोमवार 24 ऑक्टोबर रोजी असून ग्रहण 25 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे लक्ष्मीपुजनासाठी ग्रहणाची कोणतीही अडचण येत नाही. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला ग्रहण आहे. ग्रहण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा आहे. म्हणजे लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा तिथीमध्ये एक दिवसाचे अंतर आहे ज्यादिवशी ग्रहण आहे.
त्यामुळे दिवाळीत जरी ग्रहण आले असले तरी धार्मिक विधी अन् पुजेसाठी कोणतीही अडचण नाही असे संदर्भ धर्मसिंधू आणि निर्णयसिंधू ग्रंथांमध्ये आहे. 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजुन २६ मिनीटांनी चतुर्दशी तिथी संपून अमावस्या तिथी सुरू होते व 25 ऑक्टोबरला 4 वाजुन 17 मिनीटांनी संपणार आहे.