no images were found
तूपातील भेसळ कशी ओळखाल?
कोल्हापूर : तूप जेवणापासून ते कोणत्याही शुभकार्यात वापरले जाते. तूप हे घरीच दुधापासून बनविले जाते. पण अनेकदा आपण तूप विकत घेतो. या तूपातील भेसळ कशी कशी ओळखाची, हा प्रश्न वारंवार पडतो. तूप आणि अशुद्ध तूप यातील फरक सांगणार आहोत.
शुद्ध तूपाचा सुगंध येतो तर भेसळयुक्त तूपाचा कोणताही सुगंध येत नाही. तूपाला हाताने स्पर्श केला आणि तूप विघळले तर तूप शुद्ध आहे पण थराप्रमाणे राहले की समजायचं तूप भेसळयूक्त आहे.
एक चमचा तूप गरम करून जर तूप गरम होऊन लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे असे समजावे. पण तूप वितळण्यास वेळ लागत असेल आणि वितळल्यानंतर पिवळा रंग येत असेल तर ते तूप भेसळयुक्त आहे असे समजावे.
भेसळयुक्त तूपात आयोडीनचे दोन थेंब टाकले तरी रंग जांभळा येतो. कारण त्या तूपात स्टार्च मिसळलेला असतो.
वितळलेल्या तूपात साखर घालावी आणि हे मिश्रण हलवावे. त्यानंतर जर तुम्हाला तळाशी लाल रंग दिसून आला तर समजून जावे यात वनस्पती तेल आहे.