no images were found
अटल‘मधील अभिनेता मेहमूद हाश्मी चित्रपटातील भूमिकेसाठी देहबोली बदलण्याकरिता बनले डिलिव्हरी बॉय
कलाकार मेथड अॅक्टिंगमध्ये जातात, अनेक ऑडिशन्स देतात आणि भूमिकेसाठी अथक मेहनत घेतात, पण एखादा अभिनेता भूमिकेमध्ये सामावून जाण्यासाठी डिलिव्हरी बॉयचे काम करतो असे कधी ऐकले आहे का? भेटा मेहमूद हाश्मीला, जे सध्या एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल‘मध्ये नकारात्मक भूमिका ‘तोमर‘ची भूमिका साकारत आहेत. ते त्यांच्या अभिनयाप्रती समर्पित आहेत. ते चित्रपट व टेलिव्हिजनमध्ये निपुण होण्याच्या संधीचा फायदा घेतात, जेथे प्रत्येक भूमिका त्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी देते. २०१८ मध्ये साऊथ इंडियन अॅक्शन-ड्रामा चित्रपटामध्ये कौशल्य दाखवल्यानंतर भूमिकेसाठी तयारी करताना हाश्मी यांना विशिष्ट आव्हानाचा सामना करावा लागला. भूमिकेमध्ये सामावून जाण्यासाठी त्यांची देहबोली उत्तम असण्याची गरज होती. पण, पैशांच्या कमतरतेमुळे जिम वर्कआऊट्स किंवा योगा असे समकालीन प्रशिक्षण घेणे अवघड जात होते. तसेच त्यांनी शारीरिक परिवर्तनासाठी असमकालीन मार्ग अवलंबला, जेथे त्यांनी इच्छित देहबोली संपादित करण्यासह कमावण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले.
आपल्या जीवनप्रवासाबाबत सांगताना मेहमूद हाश्मी (तोमर) म्हणाले, ”मला भूमिकेसाठी अद्वितीय आव्हानाचा सामना करावा लागला, मर्यादित संसाधने असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी असमकालीन दृष्टिकोनाची निवड करावी लागली. मी जबलपूरमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम केले, दररोज १० ते १२ तास सायकल चालवली, ज्यामुळे दोन महिन्यांमध्ये माझे १२ किलो वजन कमी झाले. आव्हानात्मक काम असताना देखील मी अविरत कटिबद्धतेसह चित्रपटसृष्टीमध्ये सामावून गेलो. चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला तरी त्यामधून मिळालेला अनुभव बहुमूल्य ठरला आणि मला अभिनेता म्हणून करिअर घडवण्यास मदत झाली. मला समजले की, वास्तविकता पटकथापेक्षा वेगळी असते आणि भूमिकेमध्ये सामावून जाणे महत्त्वाचे असते. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना मला चिकाटी व स्थिरतेची शिकवण मिळाली, जे मी माझ्या पडद्यावरील अभिनयामध्ये समाविष्ट केले आहे. प्रत्येक भूमिकेमधून नवीन काहीतरी शिकायला मिळते आणि ती शिकवण मी माझ्या कामामध्ये अवलंबतो. अथक मेहनत तुमच्या कामामधून दिसून येते, जी प्रेक्षकांच्या निदर्शनास येते आणि प्रेक्षक भरभरून कौतुक करतात.”