no images were found
इक कुडी पंजाब दी’ च्या 100 यशस्वी भागांबद्दल अविनेश रेखी आणि तनिषा मेहता यांनी केले आभार प्रकट!
झी टीव्हीवरील मालिका ‘इक कुडी पंजाब दी’ ने आपल्या कथानकातील भरपूर नाट्यासह आणि शक्तीशाली कथानक तसेच उत्तमप्रकारे लिहिलेल्या व्यक्तिरेखांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाबच्या पार्श्वभूमीवरील ह्या मालिकेच्या पकड घेणाऱ्या कथानकातून ताकद आणि चिवटपणाचा संकेत मिळतो. मालिकेच्या पहिल्या भागापासूनच हीर आणि रांझा यांच्या आयुष्यातील चढउतारांनी प्रेक्षकांच्या हृदयाची तार छेडली आणि कथेतील सातत्यपूर्ण नाट्यमय वळणांनी ह्या मालिकेतील कुतूहल जीवंत ठेवले. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रेमासह ह्या मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी हल्लीच ह्या मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण झाल्याचा पहिला मैलाचा दगड साजरा केला.दृश्यांचे चित्रीकरण आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये टीम अतिशय व्यस्त असले तरी प्रत्येकच सदस्याने चित्रीकरणानंतर मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल छोटासा केक कापून सेलिब्रेशन केले. ह्या सेलिब्रेशन्समधून नक्कीच मालिकेचे यश आणि शतक गाठल्यावर टीमला वाटत असलेल्या अभिमान दिसून आला.
तनिषा म्हणाली, “प्रेक्षक ह्या मालिकेच्या सुरूवातीपासूनच आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आज ह्या मालिकेच्या 100 भागांच्या पूर्ततेनंतर आम्ही त्यांचे मानावेत तेवढे आभार थोडे आहेत. हे अगदी क्षणार्धात घडल्यासारखं वाटतंय. हीरची भूमिका साकारण्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्वोत्तम देण्याकरिता ह्या व्यक्तिरेखेचे पैलू उलगडून पाहण्यासाठी मी उत्साहात आहे.”
अविनेशम्हणाला, “मला वाटतं 100 भागांची पूर्तता ही तर आमच्या ह्या मालिकेच्या उत्तम प्रवासाची फक्त सुरूवात आहे. आमच्या अथक परिश्रमाचे चीज होत असल्याचे पाहून खूप छान वाटतंय आणि नक्कीच आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांशिवाय हे शक्य होऊ शकले नसते. आम्ही सगळेच खूप आभारी आहोत आणि हा कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि क्रू सदस्य अशा अख्ख्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे, जे आज ही मालिका जे आहे तिला ते बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मी कायमच माझे सर्वोत्तम देण्याचे आणि तुमचे पुरेपूर मनोरंजन करण्याचे वचन देतो.”हा उच्चांक प्रस्थापित केल्याबद्दल अख्खी टीम खूप आनंदात सेलिब्रेशन करत असताना, पुढील भागांमध्ये प्रेक्षकांसाठी मोठे नाट्य प्रतीक्षा करत आहे.