no images were found
गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिग 29K लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलट बचावला
पणजी : गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिग 29k हे लढाऊ विमान कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नियमित उड्डाण भरताना विमान क्रॅश झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत विमानाचा पायलट बचावला आहे. पायलटची प्रकृती स्थिर असल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिग 29k लढाऊ विमान हे नियमितपणे उड्डाण भरणाऱ्या विमानांपैकीच एक विमान असून पायलट हे विमान घेऊन समुद्राच्यावरून जात असताना टेक्निकल एरर येवून विमान त्याचठिकाणी क्रॅश झाले.
दुर्घटनेतून सुदैवाने पायलट बचावला आहे. परंतु या विमान दुर्घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यातून सर्व माहिती समोर येईल असे सूत्रांनी सांगितले आहे. भारत सरकारने रशियाकडून 25 मिग-29K लढाऊ विमान खरेदी केले होते. 2011मध्ये झालेल्या एक विमान दुर्घटनेत दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. या विमान दुर्घटनेवेळीही विमानांच्या विश्वासहार्यतेवर सवाल करण्यात आले होते.