
no images were found
पर्सिस्टंट’च्या डॉ. आनंद देशपांडे यांचे
आज शिवाजी विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधील तंत्रज्ञान विभाग, संगणकशास्त्र विभाग व एमबीए युनिट, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अपॉर्च्युनिटी फॉर दी इंडस्ट्रीज इन दी एज ऑफ डिसरप्टीव्ह टेक्नॉलॉजी” या विषयावर पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, बुधवारी (दि. ११) सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) दिगंबर शिर्के असतील.
कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) प्रमोद पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन यांची विशेष उपस्थिती असणार आहे. एमबीए युनिटच्या संचालक डॉ. दीपा इंगवले, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता एस. ओझा, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. (डॉ.) पी. डी. पाटील हे कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत. या विशेष व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.