Home Video न्यू कॉलेज ऑफ फार्मसी चे वार्षिक स्नेहसंमेलन “कलापर्व 2026” जल्लोषात संपन्न:पुस्तके: ज्ञानाचा अनमोल ठेवा- श्री. मकरंद देशमुख

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी चे वार्षिक स्नेहसंमेलन “कलापर्व 2026” जल्लोषात संपन्न:पुस्तके: ज्ञानाचा अनमोल ठेवा- श्री. मकरंद देशमुख

18 second read
0
2
43

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी चे वार्षिक स्नेहसंमेलन “कलापर्व 2026” जल्लोषात संपन्न:पुस्तके: ज्ञानाचा अनमोल ठेवा- श्री. मकरंद देशमुख

कोल्हापूर- (प्रतिनिधी): पुस्तके हाच ज्ञानाचा अनमोल ठेवा असून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन संस्कृती जपण्याबरोबरच वाचनाची आवड ही जपली पाहिजे असे प्रतिपादन लोकमत समूहाचे उपाध्यक्ष श्री. मकरंद देशमुख यांनी येथे केले. श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी च्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे हे होते.

       याप्रसंगी श्री.मकरंद देशमुख व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, संचालिका सौ. सविता पाटील, अध्यक्ष मा. श्री. बी. जी. बोराडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील प्राध्यापकांना विशेष योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच 2026 चे जनरल चॅम्पियन्स ट्रॉफी द्वितीय वर्ष बी. फार्मसी व द्वितीय वर्ष डी. फार्मसी यांनी पटकावली.

     

यावेळी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकल गीत, भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडविणाऱ्या विषयावर सुंदर सांस्कृतिक सादरीकरण केले.

या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. डी. जी. किल्लेदार, खजानिस मा. श्री. वाय.एस. चव्हाण, संचालक मा. श्री.पी.सी पाटील, मा. श्री. सी आर गोडसे, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे, न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्या सौ. ए. एस. पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

          स्वागत व प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी केले. तसेच वर्षभर राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. प्रा. योगेश पुजारी व सौ. पूजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रियांका गायकवाड यांनी आभार मानले.

       कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. भक्ती वाली, प्रा. अंजली महाडिक,प्रा. प्रज्ञा घरपणकर, प्रा. रोहिणी ताटे, प्रा. योगेश कोळेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…