no images were found
अमृत योजनेची कामे तात्काळ पूर्ण करा; मुख्यमंत्री
कोल्हापूर : शहरातील प्रलंबित असलेले ११६ कोटींचे अमृत योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व जल अभियंता हर्षजित घाटगे यांना केली.ठेकेदार कंपनीने डिसेंबर २०२३ अखेर योजनेचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी यावेळी दिली. कोल्हापूर शहरातील अमृत योजनेतून करण्यात येत असलेली कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक मुंबईत घेण्यात आली.
योजनेंतर्गत ३९६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी काही किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे; परंतु परिणामी योजनेची कामे रखडली आहेत. खोदाई केलेल्या रस्त्यांचे ठेकेदार कंपनीने रिस्टाेरेशन न केल्याने शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे सर्व सामन्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्याबरोबरच अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १२ टाक्या आणि दोन संप बांधण्यात येणार आहेत; मात्र सर्वच कामे रखडली आहेत. गेली अनेक वर्षे निधी असूनही योजनेचे काम रखडले असल्याने मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्रशासक डॉ. बलकवडे, जल अभियंता घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.