Home शासकीय महापालिके कडून थकबाकीदारांचे ३४ लाख ५८ हजार थकीत रक्कम वसुल

महापालिके कडून थकबाकीदारांचे ३४ लाख ५८ हजार थकीत रक्कम वसुल

12 second read
0
0
50

no images were found

महापालिके कडून थकबाकीदारांचे ३४ लाख ५८ हजार थकीत रक्कम वसुल

 

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत  यामध्ये ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत ४५ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आलीत. तसेच थकबाकीपोटी रु.३४,५८,५१/-  इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली.

            या कारवाई मध्ये रेल्वे विभाग कोल्हापूर, हॉटेल सुखसागर, हॉटेल गिरीजा, यंशवत कुलकर्णी, अरुण खिरोळकर, सुवर्णा सुमारे,सुर्याजी जरग, फारुख सयद, दत्तात्रय गायकवाड, जयकुमार मगदुम, शामलाल पंजवाणी, अशोक पोवार, आंनदी खराडे, पाडुरंग वाघवेकर, बाबु आयरेकर, विष्णू गुरव,उदय जगताप,शंकर ओतारी,नरेद्र देसाई,रावसो नाईक,अनंत ओतारी, समीर भालदार,माधव देंशपाडे, गणपती पाथरे,किरण पोळ इत्यादी कनेक्शन थकबाकी ने बंद करण्यात आली.

पाणी पुरवठा विभागाकडे आज अखेर गुगलपे, फोनपे, पेटीएम तसेच ऑनलाईन पेमेट सुविधेद्वारे सुमारे १ लाख 20 हजार लोकांनी रु. १० कोटी ४८ लाख इतकी रक्कम भरणा केली आहे. तसेच स्पॉटबिल प्रणालीद्वारे सुमारे ११ हजार १७३ लोकांनी रु.३ कोटी ४३ लाख ७१ हजार इतकी रक्क्म भरणा केली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या रु.७० कोटी उदिदष्टापैकी रु.४५ कोटी म्हणजेच सुमारे ६५ टक्के इतकी वसुली करण्यात अलेली आहे.

ही वसुलीची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, अमर बागल, संजय पाटील, मधुकर कदम, नरेद्र प्रभावळकर, सर्व मिटर रिडर व सहाय्यक यांनी भाग घेतला.

हि वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असल्याने सर्व खाजगी तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयाकडील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …