
no images were found
शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८
दिवस वाहतूकीसाठी बंद
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं २ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत हा रस्ता पुर्ण वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असलेने या रस्त्यावरील वाहतूक बिंदू चौक ते लक्ष्मीपूरी पोलिस स्टेशन ते लक्ष्मीपूरी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरुम ते दसरा चौक व दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदीर ते महाराणा प्रताप चौक ते लक्ष्मीपूरी पोलिस स्टेशन ते बिंदू चौक या मार्गावर वळविण्यात आली आहे. तरी नागरीकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.