no images were found
विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता स्वत:हून मेकअप करतात?
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है‘मध्ये ‘गोरी मेम‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदिशा श्रीवास्तव त्यांची स्टायलिश भूमिका अनिता भाबी साकारण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे अनिताची भूमिका साकारणाऱ्या विदिशा स्वत:हून मेकअप करतात. त्यांचा साधेपणावर अधिक विश्वास आहे, ज्यामुळे मालिकेमधील भूमिकेला शोभून दिसेल असा मेकअप करतात. त्यांच्या मते या मेकअपमुळे नैसर्गिक हावभाव दिसण्यासोबत दोष लपले जातात आणि कोमल व तेजस्वी लुक मिळतो. विदिशा यांचे त्यांची मेकअप कौशल्ये व स्टायलिंगसाठी कौतुक करण्यात येते.
आपल्या मेकअप व स्टायलिंगबाबत सांगताना विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबीम्हणाल्या, ”अनिता भाबीची भूमिका साकारण्यासाठी माझे अनेकदा कौतुक करण्यात आले आहे. मी घराबाहेर जाते तेव्हा लोक माझ्याजवळ येऊन विभुती (आसिफ शेख) आणि तिवारीजी (रोहिताश्व गौड) यांच्यासोबतच्या माझ्या केमिस्ट्रीची प्रशंसा करतात. अनेक तरूणी मालिकेमधील माझ्या लुकचे कौतुक करतात, मला माझ्या मेकअप रूटीनबाबत, तसेच साडीबाबत विचारतात. अशा प्रशंसांमधून मला खूप आनंद होतो. अचंबित बाब म्हणजे अनेकांना माहित नाही की मी स्वत:हून मेकअप करते आणि इच्छित लुक मिळवण्यासाठी फक्त वीस मिनिटे लागतात. अनिताची ताकद तिच्या प्रबळ व्यक्तिमत्त्वामध्ये सामावलेली असली तरी केला जाणारा मेकअप माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे. प्रॉडक्शन टीमने मेकअप आर्टिस्ट्स नियुक्त केले असले तरी मी स्वत:हून मेकअप करण्याला प्राधान्य देते. माझ्यासाठी मेकअप आणि हेअर स्टाइल करणे थेरपी सारखे आहे. मी अधिक प्रमाणात फाऊंडेशन्स लावण्यापासून दूर राहते, तसेच भुवया छान ठेवते आणि अधिक प्रमाणात मेकअप करणे टाळते, ज्यामुळे माझा लुक अधिक मोहक दिसतो. माझ्या मेकओव्हरची खासियत म्हणजे मी भुवया आकर्षक करण्यासह मस्काराचा योग्यपणे वापर करते. माझ्या विश्वास आहे की, कोणत्याही कलाकारासाठी संवादापेक्षा डोळे अधिक बोलके असतात. मी माझ्या मेकअपमध्ये नैसर्गिक टोन्स, आकर्षक शेड्सचा वापर करते, जे माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असतात. न्यूट्रल शिमर माझ्या नैसर्गिक स्किन टोनला ग्लॉसी चमक देतात. वर्षानुवर्षे मी उत्साहवर्धक मेकअप हॅक्सचा अवलंब केला आहे, जसे कॅमेऱ्यावर तेजस्वी प्रभाव दिसण्यासाठी माझ्या फाऊंडेशनमध्ये आर्गन ऑईल मिसळते. भूमिका साकारण्यामध्ये वैविध्यपूर्ण असण्यासाठी मेकअप अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो लूकला साजेसा असतो आणि प्रत्येक व्यक्तिमत्त्वामध्ये उत्साहीपणाची भर करतो. बालपणी देखील सण, नृत्य परफॉर्मन्स व नाटकांदरम्यान मी मेकअपसह प्रयोग करण्याचा आनंद घेतला. मी प्रोफेशनल मेकअप प्रशिक्षण घेतलेले नाही, तरीदेखील शास्त्रीय नर्तिका म्हणून माझ्या पार्श्वभूमीने मला मेकअपमधील बारकावे जाणून घेण्यास मदत केली आहे. अनिता आणि मी विविध रंगांमधील आकर्षक साड्या नेसण्याला प्राधान्य देतो, ज्यामध्ये लक्षवेधक व पेस्टल शेड्सचा समावेश असतो. यामधून मला क्लासी व मोहक लुक मिळतो. मी इंडो-वेस्टर्न फ्यूजन लुकसाठी पाश्चिमात्य पोशाखासोबत भारतीय फॅब्रिक्स परिधान करते. या फ्यूजनला साजेशी आभूषणे देखील परिधान करते, ज्यामध्ये पारंपारिक व आधुनिक डिझाइन्सचा समावेश असतो. माझ्या अभिनय अनुभवासह मी आत्मविश्वासाने सांगू शकते की भूमिकेच्या लुकसाठी योग्य मेकअप व स्टायलिंग महत्त्वाचे आहेत, जे प्रत्येक भूमिकेला विशिष्ट व्यक्तिमत्त्व देतात.”