Home मनोरंजन प्रजासत्ताक दिनी सोनी सब वाहिनीच्या कलाकारांकडून संदेश

प्रजासत्ताक दिनी सोनी सब वाहिनीच्या कलाकारांकडून संदेश

44 second read
0
0
18

no images were found

प्रजासत्ताक दिनी सोनी सब वाहिनीच्या कलाकारांकडून संदेश

 

संपूर्ण भारत येत्या 26 जानेवारी रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज होत असताना, सोनी सब वाहिनीचे कलाकार आपल्या देशाच्या नागरिकांना एक विशेष संदेश देत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, हे टेलिव्हिजनवरील कलाकार लोकशाहीच्या उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत आणि सैनिकांबद्दलचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

सोनीसब वाहिनीवरील ‘वागले की दुनिया’ मालिकेत राजेश वागलेची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्हणतो,“आज, प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण लक्षात ठेऊया की,हा तो दिवस आहे, ज्यादिवशी आपली राज्यघटना लिहिली गेली. आज मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण आपल्या घटनेचे पालन करूया, कारण ही घटना म्हणजे आपल्या लोकशाहीची आधारशीला आहे,सर्वोपरी आहे. तिची तत्त्वे जपण्यासाठी आणि तिच्या सन्मानासाठी आपण एकजूट होऊया.”

 सोनी सब वाहिनीवरील ‘आँगन अपनों का’ मालिकेत आकाश अवस्थीची भूमिका साकारणारासमर वरमानी म्हणतो,“या प्रजासत्ताक दिनी, मला आपले सैनिक सातत्याने करत असलेल्या समर्पणाचे कौतुक करायचे आहे. त्यांचे बलिदान आजच नव्हे तर नेहमीच लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला शांतता आणि सुरक्षितता देण्यासाठी आपले सैनिक नेहमीच आपल्या सीमेचे रक्षण करतात. हे केवळ कर्तव्यच नाही; तर हा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचादेखील त्याग आहे. आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या राष्ट्राचे संरक्षण करणार्‍या या शूर स्त्री-पुरूषांचे- खर्‍या नायकांचे स्मरण करण्यास क्षणभर थांबूया.

 सोनीसब वाहिनीवरील ‘वंशज’ मालिकेतधनराजची भूमिका साकारणारा गिरीश सचदेव म्हणतो,“आपल्या जीवाचे रक्षण करणार्‍या, आपल्या देशाच्या त्या शूर सैनिकांना माझा पहिला सलाम. आपल्या अधिकारांचे रक्षण करणार्‍या आपल्या राष्ट्राच्या संविधानाला माझा दुसरा सलाम समर्पित आहे. आपल्याला मिळणारी सुरक्षितता तसेच स्वातंत्र्य या दोहोंच्यामुळे सुनिश्चित होते.”

 

फौजी के खून का हर एक कतरा मेरे लिए साँस लेकर आता है

उसका जिंदा न रहना मेरे जिंदा होने का एहसास लेकर आता है

गणतंत्र दिवस एक ऐसा मौका और दिन खास लेकर आता है

जो हर शहीद की याद हमारे दिल के पास लेकर आता है

जय हिंद!

 सोनी सबवाहिनीवरील ‘पश्मीना-धागे मोहब्बत के’ मालिकेतअतुल कौलची भूमिका साकारणारा राकेश पॉल म्हणतो,“मी एका लष्करी अधिकार्‍याचा मुलगा असल्याने माझा फौजी जीवनाशी जवळून परिचय आहे, मी आपले संरक्षण करणार्‍या; इतकेच नाही तर जीवनाला सर्वार्थाने भिडण्याचे धडे देणार्‍या आपल्या सैनिकांचे कौतुक करतो. त्यांचा अतूट उत्साह आणि अदम्य चैतन्य अतुलनीय आहे, कोणत्याही परिस्थितीत सैनिकाची लवचिकता कधीही कमी होत नाही. आपल्या धरती मातेच्या वाघांना माझा मनापासून सलाम, त्यांच्या प्रति मी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो.”

 सोनीसब वाहिनीवरील ‘वंशज’ मालिकेतभूमीची भूमिका साकारणारी गुरदीप पुंज म्हणते,“सैनिक हे खरे सुपर हिरो आहेत आणि सीमेवर उभे राहून आपल्या देशाचे तसेच आपल्या जीवाचे रक्षण करणार्‍या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते. मी या शूर सैनिकांबद्दल तसेच त्यांच्या कुटुंबियांबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करते, ज्यांनी आपली मुले, भाऊ, पती, वडिल यांना संरक्षणाच्या निःस्वार्थ कामगिरीसाठी सीमेवर पाठवण्याचे अतुलनीय धैर्य दाखवले आहे. आपल्या प्रियजनांना आपल्या राष्ट्राचे रक्षक म्हणून काम करण्याची अनुमती दिल्याबद्दल मी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानते.”

 सोनी सब वाहिनीवरील ‘वागले की दुनिया’ मालिकेतराधिका वागलेची भूमिका साकारणारी भारती आचरेकर म्हणते,“आपल्या देशाचे आणि देशवासीयांचे रक्षण करणार्‍या, तसेच आपल्या देशाचे आणि जीवाचे रक्षण करण्यासाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळ राहणार्‍या सर्व सैनिकांना माझा मनापासून सलाम. तुम्हा सर्वांना सलाम. देव तुम्हाला निरोगी आणि सुरक्षित ठेवो. जय हिंद!”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…