no images were found
ताराबाई पार्क मधील डी मार्ट मनसे कार्यकर्त्यांनी पाडले बंद…!!!
कोल्हापूर (प्रतिनिधी ) – ताराबाई पार्क येथील डी मार्टमध्ये खाद्य पदार्थाच्या पॅकमध्ये एका ग्राहकाला आळ्या सापडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डी मार्टवर हल्ला बोल करून आंदोलन केले. दरम्यान, बॅन डी मार्ट ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, डि मार्ट मधील ८ पॅकमध्ये आळ्या सापडले असल्याचे आंदोलन सांगितले.डि मार्ट मधील ८ पॅकमध्ये आळ्या सापडल्याने जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत व मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डी मार्टवर सोमवारी सायंकाळी हल्लाबोल केला. अन्न व औषध प्रशासनाच्या श्री. शिंगटे व श्री. कदम या अधिकाऱ्यांसह बुरशीचं आळ्या सापडलेला खाद्य पदार्थ खायला घालून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनसेच्या दणक्याने अन्न व औषध प्रशासनाकडून आदेश येताच मनसे पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट बंद करावयास लावले व अन्न व औषध प्रशासनाकडून सील करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. डी मार्ट सील करून अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावरती खटला दाखल केला आहे, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केले की, कोल्हापुरातील जनतेने इथून पुढे डी मार्ट मध्ये खरेदी करू नये. बॅन डी मार्ट ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात यावी. इथून पुढे डी मार्ट वरती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीने तीव्र लढा उभा करेल.
या आंदोलनामध्ये विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, तालुका उपाध्यक्ष अरविंद कांबळे, शहर सचिव यतीन होरणे, संजय चौगुले, उत्तम वंदुरे, सॅम मुधळे, यश केंबळे, नितेश गणेशाचार्य, यश केंबळे, राघव सरदेसाई, निलेश आजगावकर, वैभव अस्वले , गणेश शिंदे, बाजीराव दिंडोर्ले आदी सहभागी झाले होते.