no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने नवीन स्टॅंडर्ड ग्रेड म्हणून इनोव्हा क्रिस्टा जीएक्स प्लस सादर केली
बंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज इनोव्हा क्रिस्टल लाइनअपमध्ये, जीएक्स प्लस या नवीन ग्रेडची घोषणा केली आहे. नवीन जीएक्स प्लस ग्रेडमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स आहे जे ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्कृष्टता देण्यासाठी टीकेएम ची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. इनोव्हा क्रिस्टा लाईनअपला पुनरुज्जीवित करत, नव्याने सादर करण्यात आलेल्या इनोव्हा क्रिस्टा जीएक्स प्लस ग्रेडमध्ये 14 अतिरिक्त फीचर्स आहे, जे एकंदर ड्रायव्हिंग अनुभव वाढवून फंक्शनल आणि एस्थेटिक सुविधांचे सुसंवादीपणे मिश्रण करते.
इनोव्हा क्रिस्टा जीएक्स प्लसच्या प्रमुख फीचर्समध्ये रीअर कॅमेरा, ऑटो-फोल्ड मिरर, डीव्हीआर, तसेच डायमंड-कट अलॉयज, वुड पॅनेल्स आणि प्रीमियम फॅब्रिक सीट्स यांसारख्या सौंदर्यात्मक आणि फंक्शनल फीचर्सचा समावेश आहे. 7- आणि 8-सीटर जीएक्स प्लस ग्रेड सुपर व्हाइट, अॅटिट्यूड ब्लॅक मीका, अवंत-गार्डे ब्रॉन्झ मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि सिल्व्हर मेटॅलिक या पाच आकर्षक कलर मध्ये उपलब्ध आहे, जे प्रत्येक वाहनाच्या अष्टपैलू पॅलेटमध्ये एक अद्वितीय फ्लेअर जोडतो.
श्री सबरी मनोहर – वाईस प्रेसिडेंट, सेल्स-सर्व्हिस-युज्ड कार बिझनेस, टोयोटा किर्लोस्कर मोटर, नवीन लाँच बद्दल बोलताना म्हणाले,“2005 मध्ये लॉन्च झाल्यापासून इनोव्हा ब्रँडने उद्योग बेंचमार्क सेट करून सेगमेंट लीडर म्हणून अतुलनीय प्रतिष्ठा मिळवली आहे. गुणवत्ता आणि विश्वास असलेल्या, इनोव्हाने भारतीय पिढ्यांच्या विविध वाढलेल्या गरजा पूर्ण केल्या आहेत आणि तेच महत्त्वाकांक्षी मूल्य टिकवून ठेवले आहे. आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, उदयोन्मुख ग्राहकांच्या ट्रेंडवर आधारित, टीकेएम मधील आमच्या ब्रँडला प्रासंगिक आणि मल्टी-फंक्शनल ठेवण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतो.
नव्याने सादर केलेली इनोव्हा क्रिस्टा जीएक्स प्लस ग्रेड आमच्या इनोव्हा क्रिस्टा च्या सध्याच्या लाइन-अपला पूरक आहे. नवीन सादर केलेले फीचर्स हे अॅडव्हान्स फीचर्स आणि मल्टी-फंक्शनॅलिटीद्वारे अधिक मूल्य ऑफर करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. आम्हांला खात्री आहे की नवीन ऑफर ग्राहकांना आकर्षित करत राहील आणि अशा प्रकारे भारतातील सर्वात लोकप्रिय एमपीव्ही होण्याचा इनोव्हाचा वारसा बळकट होईल.”