no images were found
व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने वाराणसीत भूताची दहशत
वाराणसी : रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या पांढऱ्या आकृतीनं स्थानिकांची झोप उडवली आहे. लहान मुलं रात्री बाहेर पडत नाहीत. अंधार पडू लागताच सगळे जण घरात थांबतात. कोणीच बाहेर जात नाही. वाराणसी विकास प्राधिकरण परिसरात दहशत पसरली आहे. या प्रकरणात काही मुलांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल, असं गौतम यांनी सांगितलं.
२२ सप्टेंबरला एका ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. बनारसमधील छतांवर एक पांढरा कपडा घातलेलं भूत चालत असल्याचा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी पोलीस चौकशीची मागणी केली आहे, असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. छतावर फिरणाऱ्या पांढऱ्या आकृतीचे तीन व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. कधी पांढरी आकृती पार्कच्या भिंतींवर, तर कधी पंपिंग स्टेशनच्या छतांवर फिरताना दिसत आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिकांमध्ये दहशत पसरली. मुलं घरांमधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. राहणाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. व्हायरल व्हिडीओंची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. व्हीडीए वसाहतीजवळ असलेल्या बजरडीहा परिसरातील एका व्यक्तीनं अंगावर चादर घेऊन व्हिडीओ तयार केला आणि मग तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती डीसीपी आर. एस. गौतम यांनी दिली. या प्रकरणात काही मुलांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल, असं गौतम यांनी सांगितलं.