no images were found
मोदी सरकारने PFI संघटनेवर 5 वर्षांसाठी घातली बंदी
काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना सातत्याने चर्चेत आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही काढला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.
एनआयए तसेच ईडी या तपास यंत्रणांनी संयुक्तपणे २२ सप्टेंबर रोजी पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या सत्रात अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यानंतर आता या तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे केलेल्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घालण्यात आली आहे.