no images were found
रोटरी क्लब ऑफ करवीरतर्फे कर्णबधीर दिन साजरा
कोल्हापूर : रोटरी कलब ऑफ करवीर कोल्हापूरतर्फे कर्णबधीर दिनाचे औचित साधून जनजागृती तसेच नवजात बालकांची OAE चाचणी घेण्यात आली. सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सदर कार्यक्रम डॉ. मंजुश्री रोहिदास यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे प्रेसिडेंट उदय पाटील यांनी स्वागत करून केले. डॉ. अभिजित मुलीक यांनी OAE चाचणी संदर्भात माहिती दिली. OAE चाचणी कर्णबधिरांचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी केली जाते. ही चाहणी कोणत्याही मटर्नीटी हॉस्पीटलमध्ये करता येते. असे आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले.
कार्यक्रमास डॉ. वर्षा पाटील, रोटरी करवीरचे दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, सातापा पाटील, प्रकाश माने, शीतल दुग्गे, प्रवीणसिंह शिंदे यांचेसह मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. निलेश भादुले यांनी इव्हेंट मैनेजर म्हणून काम पहिले. तसेच सेक्रेटरी रो. स्वप्नील कामत यांनी सर्वांचे आभार मानले.