no images were found
रजत आणि बानी सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिकेत करिअरच्या नव्या संधीसह नवी आशा घेऊन येतात…
सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिकेत बानी (अमनदीप सिद्धू) च्या प्रवासावर आधारीत आहे. ती दृढनिश्चयी आणि महत्त्वाकांक्षी मुलगी आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असूनही ती आपल्या कुटुंबाचा जीवनस्तर सुधारण्याचा प्रवास करत आहे. नुकत्याच झालेल्या भागात बानीच्या समोर द्विधा येते. कारण ती शेअर बाजारात नोकरी करण्याचा प्रस्ताव स्वीकार करते. पण रजत (आकाश आहुजा) यावर काय प्रतिक्रिया देईल, याची तिला चिंता आहे. जेव्हा बानी तिच्या समस्या घेऊन रजतला कॉल करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा लावण्या (भाविका चौधरी) मध्यस्थी करते. जेणेकरून रजत बानीचा कॉल घेऊ शकणार नाही.. रजतच्या प्रतिसाद न देण्याचा चुकीचा अर्थ बानी काढते, रजतला यासाठी काही हरकत नाही, असे वाटून ती नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेते.
पुढील भागात, रजतची नोकरी गेल्याचे बानीला कळते. त्याची चिंता आणखी वाढू नये म्हणून बानी ही गोष्ट कुटुंबियांपासून लपवते आणि त्याच्या नोकरीच्या इंटरव्ह्यूची व्यवस्था करते. तिचे प्रोत्साहन आणि पाठिंब्याने रजत इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होतो आणि एक नवी जबाबदारी घेतो. खन्ना परिवार रजत आणि बानी आणि बानी या दोघांच्या नव्या सुरुवातीचे सेलिब्रेशन करते. कारण ते दोघेही व्यावसायिक जीवनात एका यशस्वी सफरीसाठी निघाले आहेत. बानीची खरी कसोटी अजून बाकी आहे. कारण तिची स्वप्नातील महत्त्वाकांक्षा, कौटुंबिक घडामोडी आणि लावण्याचे डावपेच यांच्या दरम्यान रजतसोबतचे तिचे नाते कसे टिकून राहते, हे पहावे लागेल.
बानी अरोराची भूमिका साकारणारी अमनदीप सिद्धू म्हणाली,‘बानी सध्या खूप खुस आहे. शेअर बाजारात नोकरी करण्याच्या तिचे स्वप्न पूर्ण होत असल्याने ती रोमांचित आहे. सध्या फर्ममध्ये तिची भूमिका फार महत्त्वाची नसली तरीही त्या प्रक्रियेत राहणेच तिच्यासाठी आनंददायी आहे. तसेच तिला रजतची खूप काळजी वाटत असते. कोणत्याही नुकसानीच्या स्थितीत त्याची साथ देण्याचा निश्चय तिने केलेला असतो. बानी अत्यंत संवेदनशीलतेने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळते. रजतला ती नवी नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करते. कुटुंबाला तणावापासून वाचवण्यासाठी ही बातमी ती इतरांपासून लपवते. मला विश्वास आहे, बानी तिच्या उद्दिष्टांप्रती खरी राहत प्रत्येक परिस्थिती अत्यंत नम्रपणे आणि हुशारीने हाताळते. त्यामुळे ती भविष्यातील समस्यांवरही सहज मात करू शकेल, असे वाटते. ’