no images were found
शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतीनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यशाळा दि.12 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. सदर मार्गदर्शन कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी
भूषविले. सदर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी उच्च शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती प्रतिभा दिक्षीत, सहा. आयुक्त समाजकल्याण कार्यालय, कोल्हापूरचे तालुका समन्वयक श्री. सचिन परब व न्यू कॉलेज, कोल्हापूरचे प्रशासकीय सेवक श्री. सुहास भोसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच त्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.
सदर मार्गदर्शन कार्यशाळेत शासनाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थी/ विद्यार्थीनी, अधिविभागाचे प्रशासकीय सेवक तसेच उपस्थित शिक्षक यांना पॉवरपाँईंट प्रेझेंटेशनव्दारे देण्यात आली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेत असताना पालकांचा आर्थिक भार कमी करण्याच्या जबाबदारीच्या जाणिवेने शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यात यावा असे प्रतिपादन केले. या मार्गदर्शन कार्यशाळेस उपस्थितांचे स्वागत
पदव्यूत्तर प्रवेश विभागाच्या उपकुलसचिव श्रीमती बी. एम. नाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहा. कुलसचिव श्री. आर. आय. शेख यांनी केले. सुत्रसंचालन श्री. अभिजीत लिंग्रस, सहा. अधीक्षक यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी पदव्यूत्तर प्रवेश विभागाचे अधीक्षक श्री. उमेश भोसले व विभागातील शिष्यव़त्तीचे काम पाहणारे श्री. सिध्देश घुणकीकर व श्री. राकेश डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.