
no images were found
घरफाळा देयकामधील चालू मागणीवर दि.30 जून अखेर करामध्ये 6 टक्के सवलत योजना ऑनलाईन पे करण्यासाठी यावर्षीपासून बिलावर क्यु-आर कोड छपाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महानगरपालिकेच्या घरफाळा वसुली विभागाकडील सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता देयके जनरेट करण्यात आलेले आहेत. सदरची देयके भारतीय डाक विभागामार्फत शहर हद्दीतील मिळकत धारकांना वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सन 2025-26 या आर्थिक वर्षातील देयकामधील चालू मागणीवर महापालिका करामध्ये 6 टक्के सवलत योजना लागू इसीक. तसेच ज्या मिळकधारकांना पोस्टामार्फत बिल मिळाले नसलेस त्यांनी जवळच्या घरफाळा विभागीय कार्यालयात जावून दुबार बिलाची प्रत प्राप्त करुन घ्यावी. यासाठी कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जावून आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाची रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ मिळकतधारकांना घेता येईल. तसेच ऑनलाईन पे करण्यासाठी यावर्षीपासून क्यु-आर कोड छपाई करण्यात आला असून त्याद्वारे देखील घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गुगल पे, फोन पे, पेटीएम व कोल्हापूर महानगरपालिकेची वेबसाईट (https://propertytax.kolhapurcorporaction.gov.in/KMCOnlinePG/PropSearch.aspx) यावर देखील ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करता येईल. नागरी सुविधा केंद्रामध्ये kios मशीनद्वारे ऑनलाईन घरफाळा भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
तरी या सवलत योजनेचा जास्तीजास्त मिळकतधारकांनी लाभ घेण्यासाठी दि.30 जून 2025 अखेर कराची रक्कम भरुन 6 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या घरफाळ विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.