
no images were found
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार राज्यातील विविधता आणि समृद्ध वारशाविषयी आपले विचार मांडत आहेत
1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे आणि या महान राज्याचा समृद्ध इतिहास, येथील सांस्कृतिक विविधता आणि कला व चित्रपट सृष्टीला या राज्याने दिलेले योगदान यांचे स्मरण करून आनंद साजरा करण्यासाठी राज्यात तयारी सुरू आहे. सोनी सबचे कलाकार- जयेश मोरे, आदिश वैद्य, सायली साळुंखे, सुमित राघवन आणि आदित्य रेडिज सद्भावना व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या जीवनात या राज्याचे काय महत्त्व आहे, याविषयी सांगत आहेत.
‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “महाराष्ट्र राज्य नेहमी आपला सांस्कृतिक वारसा आणि आधुनिकता यांची सुंदर सांगड घालून आपल्याला प्रेरणा देते. मी मुंबईतच जन्माला आलो आणि मोठा झालो. मला इकडचे पुरणपोळी, श्रीखंड पुरी यांसारखे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात. सकाळच्या न्याहारीत हे पदार्थ खाऊन मी आख्खे-आख्खे दिवस काढले आहेत. आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत, तर या राज्याच्या बाणेदारपणाला आणि राज्याचा इतिहास घडवण्यात योगदान देणाऱ्यांना मी सलाम करतो.”
‘वीर हनुमान’ मालिकेत देवी अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “पुण्यातील विशाल किल्ल्यांपासून मुंबईच्या गजबजाटापर्यंत महाराष्ट्र हिंमत आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करतो. या महाराष्ट्र दिनी, मी सर्वांना विनंती करेन की, ज्यामुळे हे राज्य इतके खास बनते, त्या इथल्या लोकांच्या अदम्य उत्साहाचे आपण कौतुक केले पाहिजे.”
‘तेनाली रामा’ मालिकेत राजा कृष्णदेवरायाची भूमिका करणारा आदित्य रेडिज म्हणतो, “ऊर्जावान उत्सवांपासून ते इथल्या लोकांच्या जीवट वृत्तीपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक पैलूने मला घडवले आहे. या महाराष्ट्र दिनी, मला आजवर भरभरून देणाऱ्या आणि निरंतर प्रेरणा देणाऱ्या हा भूमीला मी वंदन करतो.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दिलीप पटेलची भूमिका करणारा जयेश मोरे म्हणतो, “आपल्या राज्याच्या स्थापना दिनी, आपल्या वैभवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे स्मरण करून राज्याने जो विकास केला आहे त्याचा अभिमान बाळगू या. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत विक्रम सरनची भूमिका करणारा आदिश वैद्य म्हणतो, “माझा जन्म मुंबईतला आणि मी इथेच वाढलो. या नगरीचे माझ्यावर खूप ऋण आहे याच नगरीने मला ओळख दिली, प्रेम दिले. आपल्या राज्याच्या वारशाचा आणि राज्याने केलेल्या प्रगतीचा मला खूप अभिमान वाटतो. हा दिवस आपल्याला शांती आणि सामाजिक सद्भावनेचा मार्ग दाखवेल अशी मला आशा वाटते. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!”